Headlines

NCP CRISIS: आमदार मकरंद पाटील अखेर अजितदादांच्या गटात Ajit Pawar

ajit pawar

MLA Makarand Patil शेकडो कार्यकर्यांसमवेत घेतली मुंबईत भेट: NCP CRISIS

NCP CRISIS, Ajit Pawar: राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर सातारा- कराडच्या दौऱयावर आलेल्या शरद पवार यांचे जंगी स्वागत करीत त्यांच्याच गाडीतून प्रवास करणारे वाई,खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी अखेर शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या गटात जाणे पसंत केले. मतदार संघातील दोन-तीनशे कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी मुबंईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला. यामुळे सातारा जिल्ह्यातील मकरंद पाटील यांच्या रूपाने तिसरे आमदार अजित पवार यांच्या गटात सामील झाले.

राज्यात झालेल्या सत्तानाट्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर समवेत असलेल्या आमदारांमध्ये व मंत्रांच्या यादीत वाईचे आमदार यांचेहि नाव होते, मंत्र्यांच्या शपथविधीची नावे राज्यपालांना कळविताना पहिल्या यादीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घ्यायची असल्याचे मला सांगण्यात आले. मात्र मी माझ्या कुटुंबाशी, कार्यकर्त्यांशी व मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केलेली नव्हती, त्यामुळे मी असा निर्णय घेऊ शकत नाही, असे मी अजितदादाना सांगितले. अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी दिली होती.

याच दिवशी शरद पवार sharad Pawar यांनी कराड दौरा जाहीर केला यावेळी वाई तालुक्याच्या हद्दीत वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार यांचे जंगी स्वागत केले तर कराड पर्यंतचा प्रवास त्यांनी शरद पवार यांच्यासमवेत केला यामुळे आमदार मकरंद पाटील यांची भूमिका स्पष्ठ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून स्व. लक्ष्मणराव पाटील हे खा. शरद पवार यांच्यासोबत होते. आमच्या कुटुंबावर शरद पवारांनी भरभरून प्रेम केले व ताकद दिली आहे. स्व. लक्ष्मण तात्यांच्या माघारी वडीलकीचा हात साहेबांनी आमच्या डोक्यावर ठेवला. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढं मोठं केलंत, प्रेम दिलंत, आपुलकी दिली, आदर दिला त्यामुळे शरद पवार यांच्यासमवेत राहिले अशी प्रतिक्रिया समाज माध्यमावर दिली मात्र पुढे मुंबईत झालेल्या दोन्हीही गटाच्या बैठकीला व्यक्तिगत कारणामुळे गैरहजर राहिले होते. NCP CRISIS

एकीकडे पाटील घराण्याचे पवार परिवाराशी जोडलेले जुने व भावनिक ऋणानुबंध तर दुसरीकडे वाई मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी किसनवीर साखर कारखाना वाचवण्यासाठी दादा गटात जाण्याचा केलेला आग्रह यामुळे आमदार मकरंद पाटील यांची कोंडी झाली होती. आमदार मकरंद पाटील यांची मतदार संघावर एकहाती पकड आहे, नुकताच जिल्ह्यातील जुना किसनवीर कारखाना त्यांच्या ताब्यात शेतकऱ्यांनी दिला आहे अडचणीतील कारखाना चालवणे त्यांच्यापुढे आव्हान आहे अशावेळी मतदार संघातील दोन कारखान्याच्या भवितव्यासाठी दादांचा बूस्टर डोस हवा आहे या कार्यकर्त्यांच्या जोराच्या आग्रहातून अखेर आमदार मकरंद पाटील यांनी आज संध्याकाळी मुंबईत देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शे दोनशे कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन मंत्री सुनील तटकरे, धनंजय मुंडे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये पाठींबा जाहीर केला. यामुळे सातारा जिल्ह्यातील शरद पवार गटालाही हा धक्का मानला जात आहे.

NCP CRISIS/ Ajit Pawar/ Sharad Pawar/

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *