साधली हॅट्रिक कामगिरी, सातारारोड परिसरातून कौतुक
सातारारोड (ता.कोरेगाव) येथील नामांकित नेटसॉफ्ट कॉम्पुटर्स सेंटर ने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करीत पश्चिम महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सेंटरसाठी दिला जाणारा बिझनेस एक्सलेंस अवॉर्डवर पुन्हा एकदा नाव कोरले. नेटसॉफ्टने सलग तिसऱ्या वर्षी दमदार कामगिरी करीत यशाची हॅटट्रिक साधण्याची किमया केली. या कामगिरीमुळे सातारारोड परिसरातून नेटसॉफ्टचे संचालक प्रताप गुजर सर व प्रिया गुजर यांचे कौतुक होत आहे.
कोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळून त्यांना जगाच्या पाठीवर स्वबळावर संगणक साक्षर बनून सक्षमपणे उभे राहता यावे यासाठी प्रताप गुजर यांनी सातारारोड येथे नेटसॉफ्ट कॉम्पुटर ट्रेनींग सेंटर सुरु केले. प्रतिकूल परिस्थितिमध्ये १४ वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आता चांगलेच बहरले असून हजारो विद्यार्थी संगणक साक्षर बनून यशस्वीपणे कारकीर्द करीत आहेत. गुणवत्ता आणि नाविन्यता यामुळे या ट्रेनींग सेंटरने आपले नाव सिद्ध केले आहे. यामुळेच MKCL चे MS -CIT , ऍडव्हान्स tally, ऍडव्हान्स Exel अशा विविध कोर्सेससाठी सातारारोड परिसरातील हजारो विद्यार्थ्यांची पहिली पसंती या कॉम्पुटर ट्रेनींग सेंटरला असते. सारथी या शासन उपक्रमाच्या विविध कोर्सेस हि यशस्वी केले. गुणवत्तेची हि परंपरा कायम राखत नेटसॉफ्ट कॉम्पुटर्स ने यंदाही सर्वोत्तम कामगिरी करीत पश्चिम महाराष्ट्रातील कॉम्प्युटर सेंटरसाठी दिला जाणारा बिझनेस एक्सलेंस अवॉर्डवर पुन्हा एकदा नाव कोरले. सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे. या हॅट्रिक कामगिरीने नेटसॉफ्ट च्या यशात वाढ झाली आहे. नुकताच हा पुरस्कार एका शानदार सोहळ्यात MKCL चे समन्वयक अनिल गावंडे, वरिष्ट व्यवस्थापक अतुल पतोडी, सातारा LLC समन्वयक विक्रम जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
या यशामध्ये आजपर्यंत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेले पाठबळ याचा मोलाचा वाटा असून नेटसॉफ्ट यापुढेही विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रावर काम करीत राहील असा विश्वास संचालक प्रताप गुजर सर यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल संचालिका प्रिया प्रताप गुजर यांचेसह वैभवी दत्तात्रय साळुंखे , रुकैया तौफिक सुतार , प्रज्ञा राजेंद्र जाधव , अनुष्का अनिल गुजर , स्नेहल नितीन महाडिक, रोहिणी सतीश आगम या तंत्रस्नेही शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच या यशाबद्दल विद्यार्थी, पालक व सातारारोड व नांदगिरी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.