देऊरला गोपालकाल्याची पुरातन परंपरा कायम,
आमचा विठोबा टिपऱ्या खेळ, सोन्याचं जानव्हं भुईवर लोळं अशा पारंपारिक भारुडातुन प्रत्यक्ष बालकृष्णाला खेळात आमत्रिंत करीत भाविकांनी देऊरची ओळख असलेला गोपालकाल्याची पुरातन परंपरा जपली व भाविकांनी अलोट उत्साहात गोपालकाला साजरा केला.
दरवर्षी आषाढी एकादशी नंतर देऊरच्या पुरातन विठ्ठल मंदीराच्या प्रांगणात गोपालकाला उत्सव साजरा केला जातो. येथील विठ्ठल मंदीर हे पुरातन असून वास्तुशिल्पाचे अजोड उदाहरण आहे यामुळे यामंदिरास प्रतिपंढरीही म्हटलं जाते. सालाबादप्रमाणे या वर्षी या मंदीराच्या प्रांगणात गोपालकाला उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. ग्यानबा तुकारामच्या जयघोषात गावातुन दिंडी काढण्यात आली. दिंडी विठ्ठल मंदिरानजीक आल्यानंतर दिंडीची मंदीर प्रदिक्षणा झाली. यानंतर मंदीरासमोरच्या प्रांगणात काल्याला सुरुवात झाली. यावेळी वारकऱ्यांनी विविध खेळ खेळण्यास प्रारंभ केला व गोकुळनगरीच अवतरली. यामध्ये चला गं सया वारुळाला जावु अशा लोकगीताचर ठेका धरत नागोबाचा खेळ झाला. त्यानंतर आमचा विठोबा टिपऱ्या खेळं, सोन्याचं जान्हवं भुईवर लोळंच्या तालावर टिपर्यांचा डाव रंगात आला. याचबरोबर सागरगोट्या, हमामा व लेझीमच्या पारंपारिक खेळाने गोपालकाला अधिक बहरात आला. दरम्यान एकनाथी भारुडातील सोंग हे या गोपलकाल्याचे वैशिष्ठ असून अनेक भाविक सोंग काढून विविध विषयावर समाजप्रबोधन करत भाविकांची करमणुकही केली. काल्याची दहीहंडी फोडून सोहळ्याची सांगता झाली. यावेळी गोपालकाला गोड झाला,देव आमच्या घराशी आला असे म्हणत भाविकांनी हरिनामाचा गजर केला. याप्रसंगी हभप मोहन कदम, प्रल्हाद ननावरे. बबन तावरे, बाफना शेठ, धनसिंग कदम, प्रकाश सुतार, भीमराव कदम, सोपान कदम, शरद कदम, वसंत कदम, माधव भोईटे, विनोद पोळ, तानाजी चव्हाण ,वामन कदम, मनोज कदम, रामराव पोळ, विलास कदम, उमेश देशमुख, श्रीकांत कदम, तुषार कदम, वसंत जाधव, पांडुरंग जाधव, निलेश देशमुख, नारायण पोळ, मोहन पवार, राजेंद्र कदम, दिलीप कदम, कालिदास शिंदे, विठ्ठल कदम, विशाल कदम, संजय तावरे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध भारुडी सोंग ठरतात काल्याचे आकर्षण
एकनाथी भारुडातील सोंग हे या गोपाळकाल्याचे वैशिष्ठ असून अनेक भाविक सोंग काढून विविध विषयावर समाजप्रबोधन करत भाविकांची करमणुक करतात, यामध्ये देऊळवाला पोतराज, खेळणी भांडी विकणारी, वेडी, यमराज, नागोबा अशी विविध सोंग या सोहळ्याची आकर्षण ठरतात. यावर्षी या गोपाळकाल्याच्या ठिकाणी भर पावसात भाविकांनी काल्याचा आनंद लुटला.
देऊरच्या गोपालकाल्याला पुरातन परंपरा असून यामध्ये काल्याचे अभंग हे करंडी नावाच्या अनोख्या वाद्याच्या तालावर गायले जातात. करंडीचे अभंग हे सोहळ्याचे आणखी एक वैशिष्टे असून हे वाद्य व अभंग दुर्मिळ होत चालले आहेत याची जपणूक व्हावी अशी अशा भाविकांनी व्यक्त केली.
वसना नदीतिरावर वसलेल्या देऊरची गोपाल काल्याची सांस्कृतिक परंपरा हा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या माध्यमातून अशा परंपरा महाराष्ट्रभर पोहोचविण्याचे अमोल कार्य आपल्या हातून होतेय…..यासाठी आपल्याला शुभेच्छा…..
मनस्वी धन्यवाद सरजी