monsoon trips पावसाळी पर्यटनाला जाताय………पण जरा जपून !कशी घ्याल काळजी, जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स
निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेल्या सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांची खास करून तरुणाईची पावले या वर्षीच्या पावसाळी पर्यटनासाठी आतुर झाली आहेत. धुक्यांची दुलई, हिरवाई पांघरलेले डोगर, नागमोडी वळणांच्या वाटा, फेसाळत कोसळणारे धबधबे या गोष्टी साऱ्यांच्याच तनामनाला साद घालतात. monsoon trips
पावसाळी पर्यटनाला जाताय………पण जरा जपून ! महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये लोणावळा, माळशेज घाट, भंडारदरा, इगतपुरी, खडकवासला, ठोसेघर, कर्नाळा, खंडाळा, आंबोली, ताम्हीणीघाट, देवकुंड धबधबा, कळसुबाई, कास पठार, वासोटा, तापोळा, महाबळेश्वर अशी विविध ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीची आहेत तर अनेक ठिकाणे अजूनही दुर्गम आणि आडवाटेची आहेत. अशा ठिकाणी फिरण्यासाठी अनेक जण पसंती देतात. पावसाळा सुरु झाला की, बरसणाऱ्या धारांचा, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायची स्वाभाविकच इच्छा निर्माण होते. पण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना आपण स्वत:साठी आणि दुसऱ्यांसाठीही धोका तर निर्माण करत नाहीये ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळी पर्यटनाला जाताना आपण योग्य ती खबरदारी आणि काळजी आवश्यक आहे. त्यातच काही घटना आपल्याला या गोष्टींची जाणीव करून देतात. monsoon trips
पहिली घटना काल पहिल्याच रविवारी केळवली धबधब्यात एक युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली. जवळपास आठवड्यानंतर एका दगडाला अडकून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरी घटना लोणावळ्यानजीकच्या भुशी डॅम परिसरात पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचहून अधिक सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला. तिसरी नुकतीच घडलेली दुर्दैवी घटना म्हणजे मुंबईतील रील स्टार अन्वी कामदार हिचा कुंभे धबधब्यावर रिल बनविताना ३०० फुट दरीत कोसळून झालेला मृत्यू होय. चौथी घटना काही दिवसापूर्वी लोहगडावरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर मध्यंतरी व्हायरल झाला. रविवार असल्याने गडावर प्रचंड गर्दी झाली. गर्दी इतकी होती की, महादरवाज्याजवळ सरकायला जागा नसल्याने पर्यटक चार तास अडकून पडले होते. सुदैवाने याठिकाणी भर पावसात इथे चेंगराचेंगरी झाली नाही. या सर्व घटना पाहताना आपल्याला लक्षात येते कि पावसाळी पर्यटन हा जसा आनंदाचा तसाच जिवाला घोर लावणारा विषयही बनलेला आहे. त्या दृष्टीने पर्यटनाला जाताना खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक ठरत आहे. monsoon trips
वॉटरफॉलच्या पुढे उभे राहून विविध पोजमधील सेल्फी काढून व्हॉटस्अप, स्टेटसला टाकायचे आणि जमलं तर ट्रेकिंग नाही जमलं तर धागडधिंगा करून मौज मजा लुटायची, हाच फॅशन ट्रेंड आज बनत चाललेला आहे. सेल्फीचं आकर्षण तर एवढे या तरुणाईवर आहे की विचारू नका. धबधबे तरुणाईचे आकर्षण केंद्र बनत असून तेथील सेल्फी म्हणजे मित्रांच्या ग्रुपमधील स्टेटस सिम्बॉल झाले आहे. monsoon trips
Mansoon Trips पावसाळी पर्यटनाला जाताय………पण जरा जपून ! अशा सर्व परिस्थितीत पावसाळी पर्यटन करताना आपण खालील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
Tips for Trips In Mansoon, Mansoon Trips
१. मोबाइलवरील सेल्फी, रिल्स, स्टेटसपायी आपला जीव धोक्यात घालून फोटो घेऊ नका.
२. बहुतेक ठिकाणी निसरडे रस्ते, जागोजागी साचलेले शेवाळ, खचणारे डोंगर अशा बाबी असतात. त्यामुळे विशेष करून दुचाकी वाहने चालविताना दक्षता घेणे महत्वाचे आहे. शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे.
३. धबधबा परिसरातील पाण्याच्या अजिबात अंदाज येत अशा वेळी अतिउत्साहाने पाण्यात उतरणे टाळावे.
४. पावसाळी पर्यटन करण्यापूर्वी प्रवासाचे नियोजन व आराखडा गरजेचा असून घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट बरोबर असावेत. रबराचे शूज वापरावेत. कपड्यांचा एक जादा जोड असावा. ज्या भागात आपल्याला जायचे आहे त्या भागाची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे.
५. अनोळख्या पर्यटन परिसरात माहितगार व्यक्ती किंवा गाईड बरोबर घेतल्याशिवाय जाऊ नये. पावसाळ्यात गर्दी टाळण्यासाठी किंवा जास्त एडव्हेंचर म्हणून दुर्गम ठिकाणी, एकांताच्या ठिकाणी अनुभव नसताना पर्यटनाला जाणे धोकादायक ठरू शकते.
६. फिरायला जाताना आपण घरच्यांना त्या पर्यटन ठिकाणीची कल्पना दिली पाहिजे. त्या सोबत त्यांना हे पण सांगून ठेवलं पाहिजे की, जर काही तासांत माझ्याशी संपर्क झाला नाही तर स्थानिक बचाव टीम किंवा पोलिसांशी संपर्क करा. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
७. पावसाळी पर्यटनात त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणाचा तसेच तेथील अप्रतिम निसर्गाचा मनमुराद आस्वाद घ्या, तेथील दरी, धबधबा, धरण,तलाव, वनस्पती, पाने, फुले, झाडे, वेली यांचे निरीक्षण करा.
८. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडूनही जीव धोक्यात घालुन सेल्फी काढणे, निसरडया धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातुन भ्रमंती करणे यासाठी महामंडळाने काही मार्गदर्शक सूचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिलेल्या आहेत.त्यांचे काटेकोर पालन करावे.
९. पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये, गडकोट किल्ल्यांवरती भटकंतीसाठी, ट्रेकसाठी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने अनेक वेळा काही ठिकाणी सातत्याने दुर्घटना होताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये मानवी चुकांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
१०.पावसाळी पर्यटन किंवा ट्रेक करताना आपल्या ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबतच ट्रेकला जावे. ट्रेकमधील ट्रेकर्सची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी. ग्रुपकडे फस्ट एडचे साहित्य असावे.
११. पावसाळी ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च असावी. आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा. पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे
१२. पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी.तसेच काही पर्यटन स्थळांच्या परिसरात मोबाईल रेंजचा अभाव असतो.त्यामुळे जंगली भागात वाट चुकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या ग्रुपबरोबरच चालावे.
१३. किल्ल्यांवरील बुरुज, तट, दरवाजे, इतर अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो. चालताना आधाराला काठी सोबत असावी त्यामुळे चढणे, उतरणे व चालणे सोपे होते.
१४. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा. पर्यटन स्थळावर, किल्ल्यावर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नका.
१५. पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अंदाज नसताना पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नका. डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने त्यात उतरणे टाळावे.
१६. काही ठिकाणी वन्य प्राण्यांचा, जंगली श्वापदांचा, जळूसारख्या उपद्रवी कीटकांचा त्रास होतो अशा वेळी आपल्या जवळ मीठ तसेच ओडोमोस बाळगा.
१७. पर्यटन स्थळावर काही ठिकाणी मधमाश्यांची पोळी असतात त्यामुळे त्यांना डिवचू नका, आरडा ओरडी तसेच हुल्लडबाजी करू नका. monsoon trips
Tips for Trips In Mansoon, Mansoon Trips
वरील सर्व सूचना लक्षात ठेवल्यास आपण आपली पावसाळी पर्यटनाची सफर चांगल्या आणि आनंददायी करू शकतो. शिवाय आपल्यालाही अशा पर्यटनाच्या अविस्मरणीय आठवणी पर्यटन संपवून घरी न्यायला नक्कीच आवडेल त्यामुळे वरील सूचना पाळून आपण आपली पावसाळी सहल संस्मरणीय बनवा.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५
Monsoon Travel Tips You Need To Know For A Safe Trip! monsoon trips