कोल्हापूर काळम्मावाडी धरण पाईप लाईन योजना पूर्णत्वाकडे
दोन महिन्यात योजना होणार कार्यन्वित
Kolhapur: कोल्हापूर शहरासाठी स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेली काळम्मावाडी धरण ते कोल्हापूर थेट पाणी पुरवठा योजना आता पूर्णत्वाकडे गेली असून दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेच्या जॅकवेल पर्यंत धरणाचे पाणी आले यावेळी या पाण्याचे जलपूजन माजी मंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि जयश्री जाधव यांनी केले यावेळी कोल्हापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण होताना पाहून ते भावुक झाले अन सतेज पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
काळम्मावाडी धरण kolhapur थेट पाणी योजना
काळम्मावाडी धरण ते कोल्हापूर शहरापर्यंत ५३ किलोमीटरच्या पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना सुमारे 480 कोटी रुपयांच्या थेट पाईपलाईन प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे गेली आहे. योजना अंदाजे दोन महिन्यात कार्यान्वित होणार असून तीन उपसा पंपातून तासाला ७२ हजार लिटर पाणी पुरवठा करतील. कोल्हापूर शहराच्या भविष्यातील वाढणाऱ्या १० लाख लोकसंख्येला पुरेल असा पाणीपुरवठा करणारी योजना आहे, सध्या कोल्हापूर शहराची लोकसंख्या ६ लाखाच्या घरात आहे, शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी येथील नदी पात्रातून उपसा होऊन पुईखेडी जल शुद्धीकरण प्रकल्पातून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा होतॊ, पावसाळ्यात होणाऱ्या पुरवठा प्रदूषित पाण्याचा या थेट धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे प्रश्न निकाली निघणार आहे.
kolhapur साठी आमदारकी लावली पणाला अखेर करून दाखवलं
सतेज पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी या पाणीयोजनेसाठी आपली आमदारकी पणाला लावली होती, योजना मंजूर न झाल्यास विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली होती अखेर योजना मंजूर करून त्यास निधी आणून ती पूर्णत्वाकडे नेल्याने अखेर करून दाखवलं त्यामुळे या जलपूजनाच्या वेळी ते भावुक झाले होते.
Satej Patil: होय, मी आज आनंदी आहे!- सतेज पाटील
होय, मी आज आनंदी आहे! समस्त कोल्हापूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचं स्वप्न मी काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं! तुमच्या सर्वांच्या साथीने, असंख्य अडथळ्यांना पार करून हे स्वप्न आता पूर्ण होताना दिसतंय! हा आनंद आपल्या सर्वांचा आहे, तमाम कोल्हापूरचा आहे. अशा शब्दात त्यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या.
ही बातमी देखील वाचली का https://maharashtraone.com/?p=139: Kolhapur: अन सतेज पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले Satej Patil