ग्रामस्थांनी अवघ्या तीन तासात बांधला वनराई बंधारा
कोरेगावातील सुभाषनगरच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे श्रमदान काेरेगांव । यावर्षी पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काेरेगांव शहरातील संभाजीनगर या उपनगरातील नागरिकांनी एकत्र येवून तालुका कृषि कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन तासात वनराई बंधारा उभारला आहे.तालुका कृषि विभाग, काेरेगांव औद्याेगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने छत्रपती…