राजापूर तालुक्यातील शंभर शाळातून शैक्षणिक साहित्याचे वाटप
राजापूर/प्रतिनिधी
कोकण विभागातील दुर्गम व डोंगराळ अशा राजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी केळवली ( ता . राजापूर) येथील मातोश्री सीताबाई सोशल फाऊंडेशनने मदतीचा भक्कम हात देऊ केला आहे. फाउंडेशनचे संस्थापक यशवंत हरियाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुक्यातील सुमारे शंभर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी घेतलेलं शैक्षणिक व्रत गेली वीस वर्ष अखंडपणे जपले आहे .
केळवली (ता . राजापूर ) येथील यशवंत हरियाण यांनी आईच्या नावाने सुरु केलेल्या मातोश्री सीताबाई सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी , कष्टकरी, मजूर, महिला, विद्यार्थी व उपेक्षित घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम फाउंडेशनच्या स्थापनेपासून गेल्या वीस वर्षांपासून अविरत सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राजापूर तालुक्यातील मोरोशी ,केळवली ,कोंडोशी ,तळगाव ,कोंडीए ,सोलवणे ,तामाने , तुळसावडे अशा विविध गावातील शंभर जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थांचे शैक्षणिक विकासात योगदान देण्याच्या हेतून विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वितरण सढळ हस्ते व निःस्वार्थ भावनेतून केले जाते.
यंदाच्या वर्षीही हि परंपरा कायम ठेवत सुमारे शंभर शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक यशवंत हरियाण म्हणाले, कोकणातील राजापूर तालुक्यातील अनेक शाळा या दुर्गम आणि दुर्गम भागात आहेत, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षक व विद्यार्थी आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोकणातील या प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्याची परंपरा सुरु केली असून समाजातील अनेक दातृत्व असलेल्या लोकांनीही मायभूमीच्या सहकार्यासाठी पुढे यावे, आम्ही मातोश्री सीताबाई सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून राजापूर तालुक्याच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहू.
बाळू हरियाण ,भालचंद्र गोडुले ,,माजी सैनिक सुरेश शिंगाळे, माजी सैनिक साईबाबा मंदिर ट्रस्ट, कोंडोशी मंगेश चव्हाण, मोरोशी सोसायटी चेअरमन कोंडोशी सुरेश हरियाण व मातोश्री सीताबाई सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी ,विविध गावचे लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.