देऊर येथे भव्य रॅली व प्रचार सभा ; सातारारोड सरपंचांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
(Vidhansabha Election) : दुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या. परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत राजकारण करून येथील जनतेला वेठीस धरले. हे आजही येथील मतदार विसरले नसून पाणी देणारा व पाण्यासाठी कारवाई करणारा कोण आमदार आहे हे येथील मतदारांनी ओळखले असल्याने त्यांच्या डोक्यातील पैशाची, गर्वाची हवा या निवडणूकीत मतदार काढून घेतील असा घणाघात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान सातारारोडचे सरपंच किशोर फाळके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे गटात प्रवेश करीत आ. महेश शिंदे गटाला जोरदार धक्का दिला.
Vidhansabha Election) देऊर ता.कोरेगाव येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली.त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत आ. शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी संभाजीराव शिंदे, शरद कदम, बाळासाहेब कदम, शकीला पटेल, राजेंद्र कदम, अजय कदम, हंबीरराव कदम, विकास कदम, नाना भिलारे, निलेश जगदाळे, शांताराम दोरके, संदिप भोसले, सचिन पोळ, सुशिल पोळ, विशाल कदम, दौलतराव कदम, अशोकराव कदम, गजानन मोरे, दिलीपराव कदम, नरसिंह डिसले, नागेशशेठ जाधव, सुनील भोसले, गणेश आवळे, निलिमा कदम, विक्रम कदम, रमेश कदम, बाबुराव बुधावले, मानसिंग जाधव, वैभव कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
देऊर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आ. शशिकांत शिंदे यांची गावातून भव्य रॅली काढली.या रॅलीत शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्यानंतर रॅलीचे रूपांतर प्रचारसभेत झाले.
या वेळी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, देऊर गावात गटातटाचे राजकारण न करता कोट्यवधी रूपयांची विकासकामे केली. दुष्काळी परिस्थितीत सामुदायिक निर्णय घेऊन पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविल्या. परंतु येथील आमदारांनी या योजना यशस्वी करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर माझ्याकडे ये नाहीतर कारवाई करतो अशी दडपशाही भूमिका घेऊन दमबाजी केली. व व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आणले ही लोकशाही आहे का? असा सवाल करून ते म्हणाले,मतदार यादीतील मतदारांची नावे कमी करणे, विरोधात कोणी लिहीले, स्टेट्स ठेवले की त्यांच्या विरोधात पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून या मतदारसंघातील राजकीय संस्कृती बिघडवली जात असल्याने सामान्य जनतेमध्ये दडपशाही, अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. मतदारांमध्ये त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीची सुप्त लाट असून त्यांच्या पैसा, गर्वाची हवा या निवडणूकीत मतदार काढून घेतील. असे सांगून आ शशिकांत शिंदे म्हणाले, येथील सिमेंटचा रस्ता हा केवळ मुलामा आहे. आम्ही जलसिंचन, रस्ता, समाजमंदिर स्मशानभूमी अंगणवाडी इमारती, यासह कोट्यवधी रूपयांची विकासकामे मार्गी लावली कोणी किती कामे केली हे जनतेला माहिती आहे. ते पुढे म्हणाले, भुमीपुत्राची नक्की व्याख्या काय जिथे माझी माणसे आहेत तेथील मी भुमिपुत्र असून यापुढेही देऊरच्या जनतेची विकासकामातून उतराई करण्याची माझी जबाबदारी आहे. असे सांगून आ शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर आसूड ओढले.लोकसभा निवडणूकी नंतर त्यांना लाडकी बहिण आठवली पण या बहीणींच्या सुरक्षिततेची सरकार हमी देत नाही. शरद पवार यांच्यावर टिका करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असेही त्यांनी विरोधकांना खडसावले. यावेळी डॉ. प्रियांका कदम, केशवराव देशमुख, अमोल आवळे, ऍड.संजीव कदम यांनी मनोगत व्यक्त करून आ. महेश शिंदे यांच्या एकाधिकारशाहीवर झोड उठवली.
प्रास्ताविकात अजित कदम यांनी आ. शशिकांत शिंदे यांनी देऊर गावांसाठी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. आभार कविता देशमुख यांनी मानले.
आ. महेश शिंदे गटाला जोरदार धक्का… सातारारोडचे सरपंच तुतारीसोबत
Vidhansabha Election या प्रचार सभेत सातारारोड येथील सरपंच व आ. महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक किशोर फाळके प्रविण फाळके, राजेंद्र फाळके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ शशिकांत शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. किशोर फाळके यांच्या प्रवेशामुळे आ. महेश शिंदे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला असून किशोर नानांनी साधलेली योग्य वेळ या मतदारसंघातील हुकुमशाही, दडपशाही गाडल्या शिवाय राहणार नाही असे सांगून आ. शशिकांत शिंदे यांनी स्वाभिमान, एकनिष्ठतेचा लढा मतदार यशस्वी करून विरोधकांची पैसा, गर्वाची हवा काढून घेतील असा विश्वास व्यक्त केला.