काशीळच्या यशवंत हायस्कूल मधील 1998 इयत्ता दहावीची बॅचचा स्नेहमेळावा
1990 च्या दशकामध्ये जन्मलेले हे विद्यार्थी संस्कारमूल्य रुजवताना दिसत आहेत आपल्या शाळेसाठी भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या भावनेतून तब्बल २ ६ वर्षांनी एकत्र येत काशीळच्या यशवंत हायस्कुलच्या १ ९ ९ ८ सालच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न झाला .
1 डिसेंबर 2024 रोजी हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अर्थात मित्र, मैत्रिणी एकमेकाला पाहून भारावून गेले आणि जुन्या आठवणी एकमेकांशी सांगू लागले.
मित्र आणि मित्रत्व जपणारी ही पिढी येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवादी आहे. या स्नेहसंमेलनात एकमेकांशी सुसंवाद साधून, करमणूक, स्नेहभोजन, एकमेकाची सुख दुःख अतिशय तळमळीने सांगत होते .आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो आणि त्यासाठी ज्या शाळेने आपल्याला हे संस्कार दिले त्या शाळेसाठी आपले योगदान असणे गरजेचे आहे लवकरच पुढील असाच आनंददायी, प्रेरणादायी स्नेहसंमेलन व्हावा अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आणि अतिशय आनंदाच्या भरात एक क्षण सर्वांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले ह्या स्मृती नक्कीच प्रेरणादायी असतील यात शंकाच नाही.
1900 शतकाचा आणि 2000 या दोन्ही शतकाचा आनंद घेणे हे आपले भाग्यच आहे अशी सर्वांची प्रतिक्रिया उमटली. हे मैत्रीचं नातं आणि शाळे बद्दलची ओढ कायम दृढ व्हावे हेच संमेलनातून सिद्ध झाले आणि हे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. दरवर्षी पुन्हा नव्याने भेटायचे या संकल्पाने या सोहळ्याची सांगता झाली.
या स्नेहमेळाव्यासाठी दशरथ तळेकर ,नितीन पवार, चंद्रकांत सपकाळ ,विश्वनाथ देशमाने, संभाजी जाधव, अमित कांबळे, प्रदीप जाधव ,दत्तात्रय माने, मनीषा जाधव, उर्मिला जाधव,शुभांगी काळभोर, मनीषा मासाळ ,मनीषा कोळेकर, राजेश अग्रवाल,कामिनी माने, विक्रम माने , मुराद मुजावर, सुजाता काळभोर, विक्रम कुंभार, वैशाली घाडगे व सहकारी उपस्थित होते.