Vidhansabha Election: सोनके येथे जाहीर प्रचार सभेत आवाहन
पंधरा वर्ष सर्व सामान्य जनतेची सेवा बजावत आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण कोरेगाव मतदार संघाची विकासात्मक वाटचाल केली,नेता आणि जनतेशी निष्ठा जोपासणाऱ्या अश्या नेतृत्वा ला पुन्हा एकदा निवडून देऊन इतिहास घडवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी सोनके येथील जाहीर सभेत केले.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे सोनके (ता . कोरेगाव) येथे आयोजन करण्यात आले होते या वेळी आमदार दीपक चव्हाण, सह्याद्री कदम,जिल्हा परिषद माजी सदस्य सतीश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय साळुंखे, विजयराव धुमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य विकास साळुंखे, राऊतवाडी चे सरपंच विशाल शिंगटे सोनके गावचे माजी सरपंच संभाजी धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश राव साळुंखे, सह्याद्री बँकेचे चेअरमन पुरुषोत्तम शेठ माने, युवा नेते नागेश शेठ जाधव, संभाजीराव शिंदे, घीघेवाडीचे सरपंच नारायण सावंत व महाविकास आघाडी मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते Vidhansabha Election .
Vidhansabha Election: त्यांनी हायमास दिवे लावण्यापलीकडे काय केले- आमदार दीपक चव्हाण यांचे टीकास्त्र
Vidhansabha Election: यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण कोरेगाव मतदार संघात गेली पंधरा वर्ष मी प्रामाणिक काम केलं या भागासाठी वसना उपसा सिंचन योजना गतिमान केली येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी एमआयडीसी साठी प्रयत्न केला या उलट भाजप चे माजी खासदार यांनी गावात हायमास दिवा लावण्या पलीकडे कोणत ही काम केले नाही यामुळे येथील जनतेने त्यांना लोकसभेला घरी बसवले. आता पुन्हा एकदा त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे ,जनता ते निश्चित करेल असा विश्वास आहे . कोरेगाव फलटण मतदार संघातील उरलेला विकास करण्यासाठी माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला आपण पुन्हा एक वेळ निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोनके गावचे माजी सरपंच संभाजी धूमाळ , माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ,संभाजी शिंदे, यांनी कोरेगाव उत्तर भागातून सर्वाधिक मतदान देण्याचे आश्वासन दिले.स्वागत व प्रास्ताविक संभाजी धुमाळ आभार सतीश धुमाळ यांनी व्यक्त केले.