Headlines

Ratan Tata : देशाचे उद्योग ‘रतन’ हरपले

Ratan Tata

Ratan Tata: टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन

Ratan Tata मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात वयाच्या ८ ६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टाटा उद्योग समूहाला जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवून देणारे जेष्ठ उद्योगपती Ratan Tata याचे दुःखद निधन झाले. यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. वयाच्या ८ ६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशाभिमानी असे उद्योग ‘रतन’ हरवले असून उद्योग जगतासह देशभरात सहवेदना व्यक्त होत आहे .

रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. Ratan Tata यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजे Ratan Tata

भारतीय उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या रतन नवल टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला जगाच्या पाठीवर सर्वोच्च पातळीवर नेहण्याचे काम यशस्वीरीत्या केले. टाटा सन्स चे अध्यक्ष म्हणून त्यांनी गुणवत्ता व विश्वासार्हतेला प्राधान्य दिलेलं यामुळे टाटाची सेवा व उत्पादने खरेदी करताना ग्राहक हे रतन टाटा या नावालाही पसंती देत होते एकप्रकारे विश्वासाहर्तेचे दुसरे नाव म्हणजे Ratan Tata होते. मिठापासून जग्वार पर्यंत सुमारे १ ० ० कंपन्या सध्या टाटा उद्योग समूहाच्या कवेत आहेत.

Ratan Tata टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष ते पदमभूषण सन्मान

टाटा उद्योग समूहाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर रतन टाटा यांनी भारतातातील सामान्य माणसांसाठी अतुल्य अशी सेवा व उत्पादने देण्यावर भर दिला. त्यांच्या टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे कामही जनमानसाच्या सेवेसाठी कार्यरत होते. सेवाभावी संस्था व उपक्रम यांना सढळ हाताने मदत करण्यात टाटा अग्रभागी होते. उद्योग जगतातील साधी राहणी आणि दानशूर व्यक्तिमत्व हि त्यांची ओळख होती. त्यांच्या अतुल्य कारकिर्दीचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पदमविभूषण व पदमभूषण या दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

जागतिक कंपन्या टाटाच्या ताफ्यात आणल्या

१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे TATA या उद्योग परिवारातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हावर्ड बिझनेस स्कुलच्या व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले. १९६१ मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले. तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी टाटा टी मिळवून जगप्रसिद्ध ब्रॅण्ड टेटली विकत घेतली, पुढे जागतिक पातळीवर टाटा मोटर्सच्या ताफ्यात जग्वार आणि लॅण्ड रोव्हर हा विश्वविख्यात ब्रँड घेत आपला दबदबा वाढवला. दुसरीकडे टाटा स्टीलनेही कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील TATA समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला.

भारतीयांची स्वस्त नॅनो ते सर्वात महाग जग्वार.. सगळं काही फक्त टाटा

यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे Ratan Tataनी सिद्ध केलं. याच बरोबर जागतिक पातळीवर कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय. निवृत्ती नंतर ते नव उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत. यामुळे भारतीयांची स्वस्त नॅनो ते सर्वात महाग जग्वार.. सगळं काही फक्त टाटा

TOP UP LUBRICANT
TOP UP LUBRICANT

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *