Headlines

पत्रकारांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करणार : आ.शशिकांतजी शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम पत्रकारांचा केला गौरव.

कोरेगाव/ प्रतिनिधी : पत्रकार हा समाज मनाचा आरसा असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेमध्ये नवनवीन बद्दल होत असून ते सकारात्मक आहेत. एका बाजूला पत्रकारितेत सकारात्मक बदल होत असून आहेत तर दुसरीकडे पत्रकारांच्या समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करेन, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या वतीने सातारारोड येथील हॉटेल जरंडेश्वर गार्डनच्या लॉनवर पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी आमदार शशिकांत शिंदे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तदनंतर पत्रकारांच्या गौरव समारंभात संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. व्यासपीठावर कोरेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र साबळे उपस्थित होते.

यावेळी अविनाश कदम, पत्रकार अजय कदम, गणेश बोतालजी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव खटाव व सातारा तालुक्यातील पत्रकारांचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या नरसिंग दिसले व आबा कासकर यांच्यासह मान्यवरांचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरसिंग दिसले यांनी स्वागत केले. प्रकाश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *