दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनी अभिवादन
आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, कोरेगाव विकास आघाडी व नगर पंचायतीच्यावतीने पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हॉटेल दरबारमधील कॉन्फरन्स हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरूणाताई बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ बोतालजी, विलास शहा, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांच्या हस्ते
छत्रपती शिवाजी महाराज आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील पोंभुरले येथे झाला. त्यांनी त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, असे डॉ. अरूणाताई बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक राहूल रघुनाथ बर्गे, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ बोतालजी, विलास शहा, प्रकाश राजे, संदीप दीक्षित, गणेश बोतालजी, सचिन जाधव,
राहूल प्रकाश बर्गे
यांनी मनोगत व्यक्त केले.
साप्ताहिक धनसंतोषचे कार्यकारी संपादक संतोष नलावडे यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आजू मुल्ला यांनी आभार मानले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाभाई काझी, माजी नगरसेवक सचिन बर्गे, नितीन उर्फ बच्चुशेठ ओसवाल, रशीद शेख, विजय घोरपडे, अर्जुन आवटे, संतोष बर्गे, अजित बर्गे, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश बर्गे, बाबा दुबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.