कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय ; सभापती ऍड. पांडुरंग भोसले यांची माहिती
कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव या समितीच्या मासिक कामकाजाची मीटिंगमध्ये बाजार समिती कोरेगाव येथे पूर्वांपार सुरू असलेला जनावरांचा बाजार दर शनिवारी भरत होता. असे असताना कोरोना कालावधी आणि लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली होती. असे असताना जनावरांच्या बाजाराला नवसंजीवनी देण्यासाठी बाजार समितीने कार्यक्षेत्रातील जनावरांचे खरेदी विक्री करणारे व्यापारी, शेतकरी यांची एकत्रित बैठक दिनांक २०/०६/२०२४ रोजी बोलवण्यात आली होती. त्यावेळी बाजार समितीच्या वतीने पुन्हा एकदा जनावरांच्या बाजाराचा भव्य उद्घाटन समारंभ आमदार शशिकांत शिंदे साहेब, (माजी जलसंपदा मंत्री तथा माजी पालकमंत्री सातारा) यांच्या शुभहस्ते आ.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार बाळासाहेब पाटील (माजी सहकार , पणन मंत्री ), आमदार दीपक चव्हाण, नितीन काका पाटील (अध्यक्ष ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक) सौ प्रीती किरण काळे(सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोरेगाव) यांचे उपस्थितीमध्ये दिनांक ०३/०८/२०२४ रोजी उद्घाटन करून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचे ठरले आहे. जनावरांचा बाजारात येणाऱ्या सर्व शेतकरी व्यापारी खरेदीदार दलाल यांना आव्हान करण्यात येते की आपण सर्वांनी आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी कोरेगाव बाजारामध्ये आणावीत असे आव्हान बाजार समितीचे सभापती ॲड.पांडुरंग चंद्रकांत भोसले यांनी केले. त्यावेळी बाजार समितीच्या संचालक मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करून बाजाराला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून जनावरांच्या बाजाराला गत वैभव मिळवून देऊ अशी सकारात्मक चर्चा केली. त्यावेळी परिसरातील शेतकरी व कार्यक्षेत्रातील खरेदीदार व्यापारी ,सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.