Headlines

आमदार Mahesh Shinde च्या प्रयत्नातून देऊरसाठी पाच कोटीचा सिमेंट रस्ता

Mahesh Shinde

देऊर बस्थानक ते ग्रामपंचायत चौक रस्ता कामाचे भूमिपूजन

आमदार Mahesh Shinde यांच्या विशेष प्रयत्नातून कोरेगाव तालुक्यातील देऊर गावासाठी बसस्थानक ते स्टॅन्ड ते देऊर ग्रामपंचायत कार्यालय गावांतर्गत ५ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिटी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे भूमिपूजन डॉ .अरुणा बर्गे व डॉ . हर्ष बर्गे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले.

आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी कोरेगाव तालुक्यातील गावांचा विकासकामांचा माध्यमातून कायापालट करण्याचा ध्यास घेतला असून देऊर गावावर विशेष लक्ष आहे . यामुळे याआधीही देऊरगावासाठी विविध विकास कामे केली असून पाच कोटी रुपये खर्चून होणारा देऊर बस स्थानक ते ग्रामपंचायत चौक हा भव्य रस्ता गावाच्या वैभवात भर घालेल. ग्रामस्थांनीही आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी एकजुटीने ठाम उभे राहावे असेआवाहन डॉ .अरुणा बर्गे यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजी कदम, चेअरमन धनसिंगराव कदम भाऊ, सरपंच शामराव कदम कदम, उपसरपंच गणेश कदम, तंटामुक्ती पूर्व अध्यक्ष किसनराव कदम, माजी उपसरपंच ज्ञानदेव कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कदम, संचालक ज्ञानेश्वर कदम, प्रकाश देशमुख, बाळासाहेब कदम, योगेश कदम, हनुमंतराव काकडे , भुजंगराव कदम, विष्णू काका कदम, सुनील किसनराव कदम, जालिंदर जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार महामुनी, गोकुळ रानभरे, युवराज कदम , सुनील चव्हाण, मनोज देशमुख, बाळासाहेब कदम काका ,रफिक, इनामदार , सादिक इनामदार , समीर इनामदार, गणीभाई इनामदार,, माजी चेअरमन दाउद भाई मुजावर, प्रल्हादजी रणवरे नारायण लांडगे, संकेत कदम , किशोर पिसाळ, उमेश देशमुख, पोपटराव दोरके व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Prabhukrupa Automobiles

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *