Raj thackeray दिल्ली भेटीला, अमित शहांसोबत चर्चा
देशाला लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असून दिल्ली सोबतच इकडे राज्यातही लोकसभा निवडणुकांचे रणांगण चांगलेच गाजू लागले आहे, लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरहि राज्यात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित अद्याप सुटले नाही, त्यामुळे राज्यातही राजकीय सारीपाटावर दररोज नवनव्या घटना वेगाने होऊ लागल्या आहेत. महायुतीमध्ये मनसेच्या रूपाने नवा भिडू येणार अशी चर्चा टिपेला असून तश्या घडामोडीना वेग आला आहे, मनसे अध्यक्ष Raj thackeray हे दिल्ली दौऱयावर असून त्यांनी आज गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली यामुळे राज्यात महायुतीला मनसेच्या रूपाने नवा भिडू मिळणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु झाली या नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार हे निश्चित आहे …raj thackeray NDA त सामील होणार का? शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष साथीत असताना केवळ एक आमदार असणाऱ्या मनसेची गरज भाजपला का पडली असेल? मनसेला लोकसभा निवडणुकीत सोबत घेण्यामागे रणनीती काय? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनसेच्या राजकारणाचा फायदा कोणाची वहिवाट रोखणार ? याविषयीच आज जाणून घेऊया
येत्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार अशी घोषणा देत भाजपाने लोकसभेच्या मैदानात डाव टाकायला सुरुवात केली आहे तसे पाहता याची सुरुवात मिशन लोटस च्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वीच झाली होती त्यानुसार शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे हे समवेत ४० आमदार व तेरा खासदार हे भाजपसोबत जात नव्याने युती सरकार अस्तित्वात आले यावेळी राज्याचा राजकारणात मोठा भुकंम्प झाला ज्याचे हादरे आजही जाणवत आहेत. या नव्या सरकारात मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युती तुटलेली असताना नव्या महायुतीत आता भाजपने एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्री पदावर समाधान का मानले याचे कोडे अनेकांना पडले होते त्याचे उत्तर आता जागावाटपावरून घडणाऱ्या घडामोडीत मिळत आहे. त्यानंतर काहीच महिन्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्षातही उभी फूट पडली बहुसंख्य आमदार सोबत घेऊन अजितदादा महायुतीत सामील झाले. त्यानाही सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि आठ मंत्री अशी भक्कम जबाबदारी मिळाली. यामुळे
युतीचे डबल इंजिनचे सरकार ट्रिपल इंजिन सरकार झाले आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेचे इंजिन हि महायुतीला जोडले जाणार अशा घडामोडीनी वेग घेतला आहे.
मनसे अध्यक्ष Raj thackeray यांनी अमित ठाकरे यांच्या समवेत दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत चर्चा केली यावेळी लोकसभेच्या दोन जागा देण्याचा फॉर्मुला ठरल्याचंही बोललं जात आहे. नेमकं असे झाले तर मनसे मुळे महायुतीला फायदाच होणार आहे.
भाजप च्या मिशन ४०० च्या रणनीतीमध्ये देशात बिहार, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र येथील राजकीय गणिते महत्वाची आहेत. याठिकाणी काहीही करून भाजपाला जागा बहुसंख्येने जिंकायच्या आहेत शिंदेंची शिवसेनेशी सोबत घेताना मुंबई महानगरपालिका हि दृष्टीपथात होती तयार ग्रामीण महाराष्ट्रावर वचक असलेल्या राष्ट्रवादीशी केलेली हातमिळवणी यामुळे राज्यात लोकसभेला ४० च्या पुढे असे टार्गेट ठेवले खरे
मात्र फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका या राज्यात भाजपाला आता दिसू लागला आहे जनमानसात भाजपाविषयी मत म्हणावं तस अनुकूल नाही त्यात ४० च्या पुढे या टार्गेट स्कोरला गाठणायत भाजपाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही यामुळे पुन्हा बेरजेचे राजकारण करीत भाजपने मनसेला महायुतीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. कमी पडणाऱ्या मतांची बेगमी भरून काढण्यासाठी मनसेचे इंजिनची साथ गरजेची बनली आहे याशिवाय मुबंईत उद्धव ठाकरेंचा सामना करण्यासाठी Raj thackeray च हुकमी ठरू शकतात हे भाजपचे वरिष्ठ जाणून आहेत.
शिवसेनेतून २००५साली वेगळे झालेल्या Raj thackeray यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने राज ठाकरेच्या यांच्या मनसे जोरदार साथ दिली मनसेचे पहिल्याच प्रयत्नात तब्बल १३ आमदार विधानसभेत निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकात मात्र मनसेला एवढं यश गाठता आले नाही. राज ठाकरे त्यांच्याकडे असलेला वक्तृत्वाचा गुण यामुळे त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. लाखोंची गर्दी जमवण्याची किमया राज ठाकरे यांच्या भाषणात असते मात्र या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही. काहाही असले तरी राज ठाकरे नावाचा मराठी माणसावर करिष्मा आहे आणि तो मान्य करावा लागेल. सुरुवातीला मराठी मुद्यावर संघटन वाढवणाऱ्या मनसे आता मराठी सोबत हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे, महायुतीतून बाहेर पडत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली यानंतर राज्यातील शिवसेनेच्या हिंदुत्वाची स्पेस राज ठाकरे यांनी भरून काढण्याचे काम सुरु केले . त्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई सह ठाणे, कल्याण, डोम्बवली, नाशिक, पुणे व कोकणात आहे अशावेळी राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांनी महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीच्यापासून सामान अंतर राखले. व स्वतःची वेगळी राजकीय वहिवाट चालू ठेवली. २०१९ ला मात्र त्यांनी लाव रे तो व्हिडीओ असे सांगत भाजपवर जाहीर सभांतून टीकेची झोड उठवली होती याचा फायदा महाविकास आघाडीला झाला यावेळी त्याचा पक्ष लोकसभा निवडणूका लढला नव्हता हे हि विशेष . यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी युतीत असलेले उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीत आहेत तर मनसेचा भाजपविरोधही मवाळ झाला आहे त्यामुळे मनसेचे इंजिन महायुतीच्या मार्गावर धावण्याची चिन्हे आहेत. भाजपसाठी मिशन ४० प्लस हे खूप महत्वाचे आहे एकनाथ शिंदे व अजित पवार याना सोबत घेऊनही यामध्ये भाजपाला हा आकडा गाठण्यासाठी साशंकता वाटत आहे त्यामुळेच भाजपा या मिशन मध्ये कोणतीच रिस्क घ्यायला तयार नाही असे राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणून बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून मनसेला साद घातली आहे. Raj thackeray यांच्या सभाना होणारी गर्दी, त्यांच्या नावाचा करिष्मा व त्यांची खास करून मुंबई नाशिक पुणे या भागातील मराठी माणसावरील छाप याचा फायदा भाजपाला होणार आहे तर एकमेव आमदार एवढंच माफक यश पदरात असेलेले राज ठाकरे यानाहि सत्ता सोपानावर आगेकूच करण्याची नामी संधी आली आहे त्यांनाही सत्तेच्या पॉवरबूस्टची गरज आहे. त्यामुळे भाजप व मनसे यांची जवळीक वाढली आहे. भाजपने मनसेला दोन जागांची ऑफर दिल्याची चर्चा आहे, दक्षिण मुंबई व शिर्डी या मतदार संघांची नावे पुढे येत आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे व राज ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी बाळा नांदगावकर यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली भेटीचे तपशील अजून बाहेर यायचे आहेत तरीही इकडे भाजपने अगोदरच राज्यातील आपल्या तीस जागा लढणार सांगून २० जागा जाहीर केल्या आहेत उरलेल्या १८ जागांवर शिंदे गट, अजित दादा गट यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत, हा तिढा अजून सुटला नाही त्यात मनसेला ऑफर केलेल्या जागा या एकनाथ शिंदे गटाच्या आहेत त्यामुळे शिंदे समर्थक खासदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला. त्यामुळे मुबंईत बैठकांवर बैठकाचा सिलसिला सुरु आहे.
एकूणच काय तर लोकसभेला मनसे नावाचा नवा भिडू महायुतीत सहभागी होणार का याचे उत्तर येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होईल.