PUNE RAIN: मुळा- मुठा धोक्याच्या पातळीवर, शाळांना सुट्टी जाहीर
PUNE RAIN: पुढील २४ तासांसाठी पुण्याला रेड अलर्ट
PUNE RAIN ALERT: महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
PUNE RAIN: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुण्यात सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुण्यावर जणू आभाळच फाटलं आहे अशी परिस्थती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून सुमारे ४० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु असून मुळा, मुठा आणि पवना या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पुण्यात पावसाने हाहाकार केला असून आपत्कालीन यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये कार्यरत एन डी आर एफ ची तुकडी हि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
पुण्यातील पूल खाली, विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू
PUNE RAIN: पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मध्यरात्री नंतर या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे यामुळे मुठा नदीकाठच्या सिंहगड रोड, बावधन, पाषाण, हिंजेवाडी, कोथरूड, डेक्कन, सांगवी अशा विविध ठिकाणी सखल भागातील घरे, इमारती व सोसायटीत पाणी घुसले यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर पुण्यातील भिडे, संगम, होळकर पाण्याखाली गेल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली. भिडे पुलाजवळ विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला तसेच मागील २४ तासांत ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट, शाळांची सुट्ट्या जाहीर
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून पुढील २४ तासांसाठी पुणे- पिंपरी चिंचवड शहरांसोबत संपूर्ण पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला असून शाळां व कार्यालयांना सुट्टया जाहीर केल्या आहेत. नागरिकांनाही महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा
पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरभागाला भेट घेत मदतकार्याला गती दिली, महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी करून शहर व जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी NDRF च्या तुकड्या तैनात केल्याचे सांगितले.
पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद
PUNE RAIN: मुळशी धरण भागातील घाट माथ्यावर सुरु जोरदार अतिवृष्टी सदृष्य पावसामुळे गुरुवार (ता. २५) पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर आदरवाडी (ता. मुळशी) येथे दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेने केले हेल्पलाईन नंबर सुरु, येथे संपर्क करा.
पुण्यातील अतिवृष्टीची आपत्तीजन्य परिस्थितीत लक्षात घेता मदत कार्य सुलभ व्हावे यासाठी पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु केले आहेत याठिकाणी मदतीसाठी पुढील नंबरवर संपर्क करा : 020 – 25501269 020 – 25506800