Marathi Movie ३० कोटीच्या पुढे जमवला गल्ला ,
शहरापाठोपाठ ग्रामीण भागातल्या महिलांच्यात चित्रपटाची क्रेझ
Marathi Movie: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे kedar shinde यांनी दिग्दर्शित केलेला आणि Jio studio निर्मित मराठी चित्रपट बाई पण भारी देवा हा ३० जूनला प्रदर्शित झाला यानंतर पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राच्या चांगलाच पसंतीला उतरला असून सलग दुसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवत आहे. खासकरून महिला वर्गाने या चित्रपटाला तुफान पंसती दिल्याने बाई पण भारी देवा बॉक्स ऑफिसवरही भारी ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने कमाईचा गल्ला ३१ कोटीच्या पार गेला आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही महिलांच्यात या चित्रपटाची क्रेझ असून थिएटरवर महिलांची तुफान गर्दी असल्याने या आठवड्यातही सिनेमा भारी वाटचाल करणार असे दिसत आहे. चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 6.45 कोटींचा गल्ला केला. याशिवाय चित्रपटाला IMDB 8.8 रेटिंग मिळाले आहेत. बूक माय शोवर 9.4 रेटिंग मिळाले आहेत. तर गूगलवर 9.6 रेटिंग्स मिळवळे आहे.
Marathi Movie: शहरी भागासोबत ग्रामीण भागातही ‘बाईपण भारी देवा’ ची ‘क्रेझ’
बाई पण भारी हा मराठी चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला, पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 7 कोटीची कमाई केली यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड करणार असे स्पष्ट झाले. शहरी भागात महिलांनी या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिला या नंतर माऊथ पब्लिसिटी वर या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात हि दमदार वाटचाल ठेवली असून ३१ कोटीच्या पुढे कमाईचा आकडा गेला आहे आहे. शहरी भागासोबत बाई पण भारी देवा सिनेमाचे ग्रामीण भागातील महिलांनीही कौतुक केले असून सिनेमा पाहण्यासाठी थिएटर वर महिलांची मोठी गर्दी आणि शो ला हाऊसफूलची पाटी असे चित्र सध्या महाराष्ट्रभर आहे. या आठवड्यातही चित्रपटाची वाटचाल भारीच राहणार आहे. marathi film, Baipan Bhari Deva Movie,
Bai pan bhari deva ‘या चित्रपटामुळे मला स्त्री कळाली’- केदार शिंदे
kedar shinde film, केदार शिंदे यांनी आजपर्यंत अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘मुकाम पोस्ट लंडन’, ‘गलगले निघाले’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘महाराष्ट्र शाहीर असे अनेक दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रमही त्यांनी सादर केला आहे. महाराष्ट्र शाहीर च्या यशानंतर सहा बहिणीच्या व्यक्तिरेखा आणि आणि महिला म्हणून सन्मान मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न यातून केदार शिंदे यांनी समोर आणला आहे. जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या सहाजणींची धम्माल केमीस्ट्री यातून प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.
या चित्रपटाच्या यशानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले, ” हा चित्रपट वेगळा आहे. प्रेक्षक या सहा अभिनेत्री काय करतायत हे बघायला नक्की येतील. प्रत्येक पुरुष म्हणतो की महिलांना समसमान न्याय मिळायला हवा. त्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी. त्यामुळे मला प्रकर्षाने जाणवतं की घरातल्या प्रत्येक स्त्रीने हा चित्रपट पुरुषांना दाखवणं गरजेचं आहे. कारण मी एक पुरुष म्हणून सांगतो या चित्रपटामुळे मला खरी स्त्री कळाली.”
हि बातमी तुम्ही वाचली का https://maharashtraone.com/?p=139