MNS: महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून कोकणातून सुरुवात
MNS: येत्या १५ दिवसात घेणार राज्यात मेळावे Raj Thackeray
“राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही.” असा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपली भूमिका मांडली. राज्यात सध्या जी राजकीय उलथापालथीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र दौऱयावर निघालेल्या राज ठाकरे यांचे आजचे विधान महत्वाचे मानले जात आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. कोकणातून या दौऱ्याला सुरुवात झाली यावेळी चिपळूण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते बोलत होते, यावेळी पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही. असा थेट इशारा देत आपण आपला विचार पोहोचवण्याची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी पदांनी एकमेकांशी बोलण्याऐवजी मनांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
चिपळूण येथील बैठकीनंतर ते खेड, दापोलीकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत MNS मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, यांची उपस्थिती आहे.
मिशन लोकसभा- सर्वच प्रमुख पक्ष जनतेच्या भेटीला Misson Loksabha
राज्यात गेल्या आठवड्यात मोठा राजकीय भूकंप झाला यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड मधून राज्याचा दौरा सुरु केला त्यापाठोपाठ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विदर्भ मधून राज्याचा दौरा काढत राजकीय मैदान सुरु केले. या सत्तानाट्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली होती आता ते थेट जनतेच्या भेटीला निघाले असून आगामी राजकीय वाटचालीसाठी हा दौरा कलाटणी देणारा ठरणार आहे यामुळे येत्या १५ दिवसात ते लोकसभा निवडणुकांबाबत मेळावा घेणार आहेत.
हि बातमी देखील वाचा : https://maharashtraone.com/?p=134&_thumbnail_id=135 : Raj Thackeray: मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही- राज ठाकरे read More News: https://maharashtraone.com/?p=139&_thumbnail_id=140: Raj Thackeray: मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही- राज ठाकरे