गुणवत्तेची परंपरा कायम राखली
सातारा जिल्ह्यातील देऊर येथील श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था संचलित,श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय(कला, विज्ञान व व्यवसाय शिक्षण) विभागाने फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये संपन्न झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सूयश संपादन केले.
कला शाखेच्या शेकडा 93.25 टक्के इतका निकाल लागला. पळशी येथील इनामदार सानिया अश्रफ हिने 87 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादित केला,दुधनवाडी येथील जाधव प्रियंका भानुदास 80.83% द्वितीय क्रमांक तर बनवडी येथील कांबळे अनुजा शिवाजी हिने 72.33% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून देऊरची कु.भंडारी श्रुती राजकुमार 70.50% गुण मिळवून प्रथम, पिंपोडे बुद्रुकची निकम श्रावणी ज्ञानेश्वर 69.67% द्वितीय,तर तडवळे संमत वाघोली येथील भोईटे श्रुती कमलाकर हिने 67.50% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
व्यवसाय शिक्षण विभागाचा निकाल शंभर टक्के लागला. बनवडी येथील कु.नलगे वैभवी महादेव(अकाउंट)हिने 84.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला सोनकेची कु.धुमाळ वेदिका संजय (अकाउंट ) 80.33% गुण मिळवून द्वितीय तर भांडेवाडी- देऊरचा नवाब रिहान आरिफ (ऑटो )याने 77.83 गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीमुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन हणमंतराव कदम, सचिव राजेंद्र बाळासाहेब कदम, शालेय समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम, विज्ञान शाखा सल्लागार समितीचे अध्यक्ष राजाराम कदम,संस्था पदाधिकारी, विश्वस्त,माजी प्राचार्य नितीन भंडारी व उत्तमराव महामुलकर,नूतन प्राचार्य प्रदीप ढाणे, पर्यवेक्षक प्रा.सुरेश निंबाळकर व ज्ञानेश्वर देशमुख तसेच सर्व प्राध्यापक, ग्रामस्थ,पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.
जाहिरात