कोरेगाव/प्रतिनिधी : देऊर येथील श्री मुधाईदेवी विद्या मंदिराचा मार्च २०२४ मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 99.24 टक्के लागला. या परीक्षेत 131 पैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. तन्वी उदयसिंह पवार (देऊर)हिने 92.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कु.पवार सिद्धी संतोष (रेवडी) हिने 91.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक कु. महाजन गायत्री संतोष (पिंपोडे बु.) हिने 91.00 टक्के गुण मिळवून मिळवला. कु. समृद्धी सोमनाथ कदम( पिंपोडे खुर्द) हिने 90.00 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर कु.ग्रीष्मा विश्वास गुरव (देऊर) हिने 89.20 टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकाचे यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन हणमंतराव कदम, सचिव राजेंद्र बाळासाहेब कदम, शालेय समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम, विज्ञान शाखा सल्लागार समितीचे अध्यक्ष राजाराम कदम, महाराष्ट्र वन न्यूजचे संपादक पत्रकार प्रकाश राजे, संस्था विश्वस्त व पदाधिकारी, माजी प्राचार्य नितीन भंडारी व उत्तमराव महामुलकर,नूतन प्राचार्य प्रदिप ढाणे, पर्यवेक्षक प्रा.सुरेश निंबाळकर व ज्ञानेश्वर देशमुख तसेच सर्व अध्यापक, ग्रामस्थ,पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.