Chandrayaan_3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, मोहीम फत्ते
दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातून देशवासियांचे कौतुक
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली भारताची चांद्रयान ३ हि मोहीम फत्ते झाली व भारताने ऐतिहासिक असा चंद्र विजय साजरा केला. संध्याकाळी ६ वा. ३ मिनिटांनी Chandrayaan_3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले व संपूर्ण देशाने आनंदोत्सवात जल्लोष केला. चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश तर चंद्रावर जाणारा चौथा देश बनला .या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इसरो च्या सर्व शास्त्रज्ञ व देशवासियांचे अभिनंदन करीत हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मनोगतामध्ये म्हणाले,” Chandrayaan_3 डोळ्यासमोर इतिहास घडताना पाहणे जीवनाची धन्यता आहे हा क्षण अभूतपूर्व असून विकसित भारताच्या विजयी सामर्थ्याचा आहे. पृथ्वी वर संकल्प करून चंद्रावर त्याची परिपूर्णता केली. इंडिया ऑन मुन हे वाक्य शास्त्रज्ञ व देशाने खरे करून दाखवले. या यशामागे शास्त्रज्ञ यांची अथक परिश्रम आणि प्रतिभा यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचला हे जगातल्या कोणत्याच देशाला शक्य झाले नाही. यामुळे चंद्राच्या बाबतीतील अनेक नव्या गोष्टी अभ्यासातून पुढे येतील. माहिती आणि तंत्रज्ञान हे देशाच्या उज्वल भविष्यासाठी आधार आहे आजचा दिवस उज्वल भविष्यसाठी प्रेरणा देईल. अशी भावना त्यांनी व्यक्त केली ते ब्रिक्स संमेलनासाठी सध्या दक्षिण आफ्रिका दौऱयावर आहेत.
इस्त्रोनं ISRO सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी Chandrayaan_3 चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज म्हणजेच २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचा समावेश असलेल्या लँडर मॉड्युललाही अपेक्षित कक्षेत (२५ बाय १३४ किलोमीटर) पोहोचवण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यापूर्वीच यश आलं होतं. विक्रम लँडरच्या लँडिंगची सर्व प्रक्रिया लँडरवरील संगणकाच्या नियंत्रणाखाली पार पडली. त्यासाठी आवश्यक आज्ञावली बेंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून (इसट्रॅक) लँडरकडे पाठवण्यात येत होत्या. बेंगळुरूजवळील ब्याललु येथील डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने लँडरशी थेट संपर्क साधून त्यावरील सर्व सेन्सर, कॅमेरा आणि इंजिनांची सातत्याने कसून तपासणी होत होते
चांद्रयान २ च्या मोहिमेत अपयश आल्यानंतर Chandrayaan_3च्या मोहिमेत बदल करण्यात आले होते. चांद्रयान ३ ला लँडिंगसाठी जागा निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. याशिवाय चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी देखील चांद्रयान मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
12 total views , 1 views today