Headlines

LOSABHA ELECTION RESULT: देशात नवं सरकार..कोणाचं, उद्या निकाल

LOSABHA ELECTION RESULT: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची देशभरात उत्सुकता

प्रकाश कुंभार (प्रतिनिधी): LOSABHA ELECTION RESULT १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सात टप्प्यात शांततेत पार पडल्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी पार पडणार असून देशात नवं सरकार कुणाचं याचा फैसला होणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रकिया देशभरात एकाच वेळी सुरु होणार असून सकाळी ८ वाजल्यापासून निकाल हाती येतील. यंदाच्या निवडणुकित सत्ताधारी रालोआ व इंडिया आघाडी मध्ये मुख्य लढत होती त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ विजयाची हॅट्रिक करणार कि राहुल गांधी इंडिया आघाडी सत्तांतर करून इतिहास घडवणार याकडे देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

LOSABHA ELECTION RESULT सर्वात मोठे लोकशाही ५४३ लोकसभा मतदार संघात निवडणुकीची प्रक्रिया निर्विग्नपणे शांततेत पार पडली. एकुण वेगवेगळ्या सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली. १९ एप्रिल ते १ जून २०२४ दरम्यान सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंख्येनुसार यंदाची निवडणूक हि जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. देशभरातून सुमारे ६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विविधतेने सजलेल्या या देशात विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांना उमेदवारी देत निवडणुकीत जनतेसमोर मत मागितले. सात टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी देशात एकाच वेळी होणार असून देशवासियांना नवं सरकार कुणाचं याच उत्तर उद्या मिळणार आहे.

मोदींचे अब कि बार ४०० पार होणार कि इंडिया आघाडी सत्तांतर करणार?

निवडणूका जिंकण्यासाठी देशातील सर्वच पक्षानी आपली ताकद पणाला लावली होती. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप व मित्र पक्षांनी अब कि बार मोदी सरकारची घोषणा देत २०१४ ला स्थित्यतर घडवून आणले त्यानंतर २०१९ च्या निवडणुकाही मोठ्या बहुमताने जिंकल्या. सलग दहा वर्ष सरकार चालवल्यावर तिसऱ्यांदा सरकार बनवण्याच्या इराद्याने भाजपने अबकी बार ४०० पारची घोषणा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात २०० च्या वर सभा घेऊन गेल्या दहा वर्षातील विकासकामांचा कामाचा लेखाजोखा मांडला तर सभांतून विरोधकांचा खरपूस समाचार घेत प्रचाराचा धुरळा उडवला. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने देशातील भाजप विरोधी पक्षांची मोठं बांधत आव्हान निर्माण केले. भाजप सरकारच्या विरोधात जनतेत जाऊन भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, तपास यंत्रणांचा गैरवापर अशा विविध मुद्यांवर रान उठवले त्यामुळे मुख्य लढत हि रालोआ विरोधात इंडिया आघाडी अशीच राहिली. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष फोडाफोडीचे राजकारण, सरकार विरोधात अँटी इकम्बसी फ़ॅक्टर, घोषणांचा पाऊस, आरोप प्रत्यारोपंच्या फ़ैरी, चुरशीच्या लढती यामुळे देशाचे वातावरण या निवडणुकीने ढवळून निघाले होते यात हे सर्व तटस्थपने पाहणारी जनता कोणाला मताचा कौल दिला ? भाजपा अबकी बार ४०० पार करीत हॅटट्रिक साधणार का? इंडिया आघाडी सत्तांतर करणार? बहुमताचा आकडा किती असणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मतमोजणी नंतर मिळणार आहे.

महाराष्ट्रात महायुती कि महाविकास आघाडी मारणार बाजी

देशात या निवडणुका विविध मुद्यावर लढल्या जात असताना तसेच विधानसभा तोंडावर असताना महाराष्ट्रात मात्र परिस्थिती हि वेगळी राहिली. भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेत सरकार बनविले त्यामुळे शिवसेना फुटली त्यानंतर अजित पवार यांना सत्तेत घेत राष्ट्रवादीवर विभाजनाची वेळ आली अशावेळी नव्याने तयार झालेले शिंदे फडणवीस पवार हे ट्रिपल इंजिन सरकार महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले तर दुसरीकडे सहानुभूतीच्या लाटेवर शिवसेना उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी यांनी निवडणुकांना सामोरी गेली कधी नव्हे ती महाराष्ट्रात राजकीय चित्र तयार झाले. काल परवा पर्यंत एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे कधी मांडीला मांडीला लावून सभा करतील याचा भरोसा जनतेला राहिला नाही त्यामुळे यंदाची निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचे बोललं जाऊ लागलं आता महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात कुणाचा कार्यक्रम होणार आणि कोण बाजी मारणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे मतमोजणी आणि त्यातील आकडेवारीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

सकाळी आठ वाजल्यापासून निकाल हाती

निवडणूक आयोगाने सर्वच मतदार संघात मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे, देशातील सर्वच मतदारसंघात एकाच सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल. प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली १४ टेबलावर मतमोजणी होईल यासाठी ८४ टेबल सज्ज असतील.सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल.राज्य निवडणूक अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. मतमोजणी निकालाची उपडेट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लाईव्ह उपलब्ध असेल यासाठी येथे क्लिक करा .https://results.eci.gov.in/

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *