Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर पाठवल्यावर विशेष संदेश
Chandrayaan-3 भारताच्या चंद्रयान ३ या अवकाश संशोधन मोहीमसाठी चांद्रयानने खुशखबर दिली आहे, चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहचल्यानंतर या चंद्रयान ३ ने ISRO इस्रोला अशी काही माहितीची खुशखबर दिली कि ज्यामुळे तमाम देशवासियांना या अंतराळ मोहिमेचा अभिमान वाटेल.
14 जुलै 2023 रोजी मोठ्या अपेक्षेने प्रक्षेपित करण्यात आलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM-3 रॉकेटवर बसलेल्या चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराळात तीन लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे. 1 ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपल्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि चंद्राच्या दिशेने त्याच्या पुढील प्रवासाचा टप्पा निश्चित केला. चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहचल्यानंतर चंद्राभोवती पाच प्रदिक्षणा पूर्ण करून 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.
Chandrayaan-3 पहिल्यांदा पाठवला चंद्राचा विस्मयकारी व्हिडीओ
Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत झेपावल्यानंतर या यानाने इस्रोला पहिल्यांदाच चंद्राचा विस्मयकारी असा व्हिडिओ पाठवला आहे.चंद्रयान-3 अंतराळयानाच्या चंद्राच्या कक्षेतील प्रवेश (LOI) युक्तीच्या वेळी चंद्र दाखविणारा एक मनमोहक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये चंद्राचे विहंगम व यानाच्या दृष्टीकोनांतून चंद्र कसा दिसतोय हे संपूर्ण जग पाहत आहे. यात यानाचा सोलर पॅनेलहि दिसत असून चांद्रयान ३ चंद्राकडे यशस्वी झेपावत असल्याचे दिसत आहे तर चंद्राच्या पृष्ठभागाचा अद्वितीय दृष्टिकोन पाहायला मिळत आहे. चांद्रयान-3 चंद्र मोहिमेतील एक मोठा टप्पा म्हणून या घटनेकडे पहिले जात असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी 5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 अंतराळयानाच्या चंद्राच्या कक्षेतील प्रवेश (LOI) युक्तीच्या वेळी चंद्र दाखविणारा एक मनमोहक व्हिडिओ ट्विटर हँडलवर “5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश (LOI) दरम्यान चंद्रयान-3 अंतराळयानाने पाहिलेला चंद्र” या ओळीसह प्रसिद्ध केला आहे . जगभरातील खगोलप्रेमींनी हा विडिओ पाहत इस्रोचे अभिनंदन केले आहे.
ISRO प्रसिद्ध केलेला अद्भुत विडिओ येथे पहा हा
चांद्रयान-3 ने इस्रो ला पाठवला विशेष संदेश .
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) साठी हा टप्पा महत्वाचा होता विडिओ सोबतच शनिवारी चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ‘मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवते’ असा संदेश इस्रोला पाठवला होता. यामुळे आता सर्वाच्या नजर या २३ ऑगस्टकडे लागल्या आहेत. चंद्र मोहीम आतापर्यंत सुरळीत चालली आहे आणि इस्रोला अपेक्षा आहे की विक्रम लँडर या महिन्याच्या अखेरीस 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल
https://maharashtraone.com/?p=390: Chandrayaan-3 अंतराळयानाने पाहिलेला चंद्र, पाठवला मनमोहक व्हिडिओ