
Highway
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग गांधारीच्या भूमिकेत.
पुलावर अपघाताची मालिका सुरूच, स्ट्रक्चरल ऑडिटच मागणी
सातारा – लोणंद महामार्गावर देऊर ता. कोरेगावच्या हद्दीत असणाऱ्या ब्रिटिशकालीन देऊर ओढ्यावरील पुलावर असलेल्या खड्ड्यामुळे माल ट्रॅकचा अपघात झाला या अपघातामध्ये पुलाचे मोठे नुकसान झाले असून हा पूल निकृष्ट झाला आहे. वारंवार होणाऱ्या अपघाता कडे महामार्ग प्राधिकरण जाणून बुजून डोळेझाक करत आहे. यामुळे या ब्रिटिशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकातून होत आहे,
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सातारा लोणंद रस्त्यावर देऊर येथील देऊर ओढा नावाच्या अरुंद पुलावर येत असताना पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार आहे. तसेच या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. आज सोमवार दि,२३ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास लोणंद बाजूकडून सातारच्या दिशेने पशुखाद्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच १२ आर. एन. ९१९७ हा ट्रक सातारा बाजूकडे जात जात होता. येथील अरुंद पुलावर आल्यानंतर पुलावरील खड्डयामध्ये ट्रक आदळून हा ट्रक पुलाच्या कठड्याला घासत जाऊन पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक वाठार पोलिसांनी सुरळीत केली. सदर धडकेत ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्याचे दगड हल्ल्याने वाहतुकीसाठी हा पुल धोकादायक झाला आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देऊर पुलावर सततचे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. अशी मागणी वाहनधारक व प्रवासी यांच्याकडून होत आहे.
