Journalist Protection Act: पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा केला निषेध
Journalist Protection Act: महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा आहे, पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. परिणामी कायद्याचा धाक उरला नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या वाढली आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या दिरंगाई व पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांना सातारा जिल्हा मराठी ग्रामीण पत्रकार संघ सलग्नित असलेल्या उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. पत्रकारांवर हल्ले वाढले असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करीत असताना पत्रकार बांधवामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे, कायदा तयार केला पण त्याची कडक अंमलबजावणी सुद्धा कडक झाली तर अशा समाज विरोधी प्रवृत्ती ना आळा बसेल, जर सरकार ने पत्रकारांच्या लोकभावना लक्षात घेतल्या नाही तर जशास तसे उत्तर द्यायला पत्रकार एकजूट आणि खंबीर आहेत, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ हा पत्रकारांच्या पाठीशी भक्कम उभा असून शासनाने या कायद्याची कडक कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी भावना पत्रकार संजय कदम, प्रकाश राजे, श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी पत्रकाराच्या निवेदनाची योग्य दखल घेण्याबाबत मी वरिष्ठांना आपली भूमिका सांगेन अशी ग्वाही वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांनी दिली
यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी सदस्य संजय कदम,पत्रकार प्रकाश राजे, ज्येष्ठ पत्रकार श्रीनिवास पवार,पत्रकार रणजित लेंभे, पत्रकार रेवण महाजन, पत्रकार तेजस लेंभे,पत्रकार शुभम गुरव,पत्रकार जलालभाई पठाण,पत्रकार अतुल वाघ,पत्रकार राहुल लेंभे, पत्रकार कमलाकर खराडे, पत्रकार शैलेश धुमाळ, पत्रकार मुकुंद काकडे, पत्रकार विजयकुमार दोरके उपस्थित होते.