Journalist Protection Act: पत्रकारांनी केली जोरदार घोषणाबाजी, प्रशासनाला निवेदन सादर
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांकडे डोळे वटारले तर खबरदर : हरीष पाटणे
Journalist Protection Act: राज्यात पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्या निषेधार्थ राज्यात आज ठिक-ठिकाणी पत्रकारांचा आवाज घुमला. प्रिंट,इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमाच्या पत्रकारांनी या कायद्याच्या अध्यादेशाची होळी करत पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांवरील हल्लेखोरांचे करायचे काय…अशा घोषणा देत आपल्या मागण्यांचे निवेदन ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालये व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून पत्रकारांनी राज्यसरकारला आपला आवाज ऐकवला.
सातारा जिल्ह्यात पत्रकार एकीचा आवाज बुलंद
Journalist Protection Act: राज्यात पत्रकारांवरील वाढलेले हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरत असून कायदा तयार झाला तरी त्याची कडक अंमलबजावणी मात्र यंत्रणेकडून होत नाही त्यामुळे असे हल्ले करणारे मोकाट फिरत असून अशा घटनांमुळे लोकशाहीत पत्रकारांच्या स्वातंत्र्य विचारला आडकाठी येत आहे त्यामुळे आज राज्यात झालेल्या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील पत्रकारही आघाडीवर होते. सातारा जिल्ह्यात पत्रकार एकीचा आवाज बुलंद झाला. पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दीप्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजीत आंबेकर, सातारा जिल्हा डिजीटल मिडीया पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांकडे डोळे वटारले तर खबरदर : हरीश पाटणे
Journalist Protection Act: राज्यात पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी उग्र आंदोलने झाली त्यानंतर पत्रकार सरंक्षण कायदा आला मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आमदार किशोर पाटील व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पाचोरा येथी पत्रकार बांधव संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्यांच्यावर कुठलीही कारवाही झाली त्यामुळे कायदा कुचकामी ठरत आहे म्हणून या कायद्याची होळी केली असून अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठीहे आंदोलन लोकशाहीला धरून करीत आहे मात्र यापुढे अशा प्रवूतीना जशास तसे उत्तर देऊ, सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची एकजूट हि ताकद असून त्यान्च्याकडे कोणी डोळे वटारून पाहिले तर गाठ आमच्याशी आहे, असेल प्रकार सातारा जिल्ह्यात आधीही खपवून घेतला नाही आणि भविष्यातही घेणार नाही, आम्ही मागे दंडुका मोर्चा काढला होताभविष्यात असाच मोर्चा राज्यात काढून हा आवाज बुलंद करू अशा शब्दात सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी ईशारा दिला व जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील घटनेतील हल्लेखोरांवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातही पत्रकार एकवटले
कोरेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले. तालुक्याच्या उत्तर, मध्य व दक्षिण भागातील पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रारंभी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पत्रकार जमले. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोस्टर झळकविण्यात आले. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमाच्या पत्रकारांनी या कायद्याच्या अध्यादेशाची होळी करत पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांवरील हल्लेखोरांचे करायचे काय…अशा घोषणा देत आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मनोज माने व पोलीस उपनिरीक्षक दिपाली मुसळे यांना सादर केले. पत्रकारांवरील होत असलेल्या हल्ल्याबाबत कारवाई होत नसल्याची भूमिका कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे,पत्रकार साहिल शहा व जयदीप जाधव यांनी मांडली. यावेळी नायब तहसीलदार मनोज माने यांनी आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य संजय कदम, ज्येष्ठ पत्रकार पत्रकार पांडुरंग बर्गे, अविनाश कदम, प्रकाश गायकवाड, प्रकाश राजे कुंभार, सतीश गायकवाड, राजेंद्र वाघ, सोमनाथ शिंदे, कविराज पंडित, राजेंद्र तरडेकर, अधिक बर्गे,, नवनाथ पवार, राजेंद्र पवार, संजय जंगम, गणेश बोतालजी ,
महेश क्षीरसागर, अजमुद्दीन मुल्ला, इमरान शेख यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
माण तालुक्यात पत्रकारांचा एल्गार
आजच्या पत्रकारांच्या आंदोलनात माण तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार सरंक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणी करीत आंदोलनाचा एल्गार केला. माण तहसिल कार्यालय व दहिवडी पोलीस स्टेशन समोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला .यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मंगरुळे , माण तालुका डिजीटल सोशल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज तांबोळी , सचिव बापूसाहेब मिसाळ, संदीप जठार , रुपेश कदम , लिंगराज साखरे, एकनाथ वाघमोडे , विशाल माने, धनंजय पानसांडे , सचिन शिंगाडे , अहमद मुल्ला , अजित कुंभार , धिरेन कुमार भोसले , चैतन्य काशिद , ओंकार माने आदी पत्रकार उपस्थित होते