Headlines

MLA MAHESH SHINDE: सर्वसामान्यांचा आधार,आपला आमदार- महेशदादा शिंदे

MLA MAHESH SHINDE

देऊर विकास सोसायटीचे चेअरमन धनसिंग सदाशिवराव कदम यांच्या शब्दांत आढावा

विकास म्हणजे नक्की काय? हे ज्या लोकप्रतिनिधींनी संपूर्ण राज्याला दाखवून दिलं संकट असो कि संधी यातून कधीही माघार न घेणारा दुष्काळग्रस्तांसाठी जलदूत तर सर्वसामान्यांसाठी देवदूत ठरलेल्या आणि संपूर्ण मतदार संघातील जनतेसाठी मायेची पाखर देणारा आपला आमदार महेशदादा शिंदे MLA MAHESH SHIND हि ओळख निर्माण केली, आज 8 ऑगस्ट रोजी साजरा आमदार साहेबांचा वाढदिवस साजरा होत आहे या निमित्ताने आमदार महेशदादा शिंदे जीवनरुपी कार्याचा घेतलेला हा आढावा
MLA MAHESH SHINDE कोरेगाव खटाव आणी सातारा या तीन तालुक्यातील गावांचा निर्माण झालेला कोरेगाव विधानसभा मतदार संघ या मतदार संघात राष्ट्रवादीच्या असलेल्या सत्ताधारी आमदाराला माजी मंत्र्याला पाडण तस् तेवढं सोपं नव्हत या साठी मोठा संघर्ष करावा लागणार होता हा संघर्ष करण्याचे धाडसी काम सध्याचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश दादा शिंदे यांनी केला आणि सातारा जिल्ह्यात मोठा राजकीय इतिहास घडला गड आला पण सिंह गेला अशी परस्थिती यामुळे राज्यात चर्चेला आली

विकासकामात तालुका अग्रेसर करण्याचे काम
10 वर्ष सत्ता असूनही विकास म्हणजे नक्की काय तो कसा करायचा हे सामान्य जनतेला विश्वासात घेऊन पटवून देण्याच धाडसी काम सद्याचे लोकनियुक्त आमदार महेश दादा शिंदे यशस्वी केले त्यामुळं आज हे नाव संपूर्ण राज्यात नावारुपास आल आहे अगदी सर्व सामान्यातला सामान्य माणूस त्यांनी आपल्या दिलदार स्वभावाने आपलासा केला केवळ व गावागावात लोकांनां गरजेची विकास कामे जलद गतीने मंजूर करून आणली आणि मतदार संघ विकासकामात अग्रेसर राहील यासाठी परिश्रम घेतले. कामातच नव्हे तर त्यांनी युवकांना हि योग्य दिशा देण्याचं काम केलं.

राज्यात सर्वाधिक निधी आणि मागेल त्या गावात सिमेंट रस्ते
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील पाणी योजना असो की खेड्या पाड्यातील विकास गावातील सर्व सामन्यात जाऊन माहिती घेऊन मागेल त्याला विकास कामे देण्यात आमदार महेश दादा शिदे कधी कमीच पडले नाहीत त्यामुळे आज राज्यात सर्वाधिक निधी खेचून आणण्याचा विक्रम त्यांनी केला आहे जवळपास हजारो कोटींची विकास कामे त्यांनी आपल्या मतदार संघातील गावागावात खेडोपाड्यात केली आहेत म्हणूनच त्यांची काँक्रिट आमदार म्हणूनही ओळख होत आहे केंद्रात पंत प्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असलेल्या राजकीय संबंधातून केवळ 3 ते 4 वर्षात त्यांनी जवळपास 600 ते 700 कोटी रुपयांचे मजबूत रस्ते तयार केले या साठी तालुक्यातील नवीन होतकरू युवकांना त्यांनी उद्योजक बनवले कोरेगाव शहराचा सर्वागीण विकास साधताना या एकट्या कोरेगाव शहरासाठी चारशे कोटी रुपयाची कामे त्यांनी केली आहेत.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार MLA MAHESH SHINDE
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज सर्वाधिक निधी खेचण्याचा इतिहास आमदार महेश दादा शिंदे यांनी करून दाखवला आहे. यामागे मतदारसंघावरील त्यांची पकड, कार्यकर्त्यामध्ये असेलेली लोकप्रियता , जनतेचा विश्वास हि कारणे आहेत आणि याच गुणवैशिष्ट्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेही लाडके आमदार म्हणून राहिले आहेत. त्यामुळे कोरेगाव मतदार संघाला संपूर्ण विकसित करणयासाठी त्यांच्या प्रयत्नांना सरकारमधून मोठी टाकत मिळत आहे.

सिंचन योजनेना मार्गी लावून ठरले ‘जलदूत’MLA MAHESH SHINDE

कोरेगाव मतदार संघातील पाण्याची भीषण परिस्थिती बदल्यासाठी संकल्प केला व तालुक्यातील रखडलेल्या वसना वांगणा व जिहे कटापुर अशा जलयोजनासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन आज त्या कार्यान्वित करण्यासाठी ककं केले. यामुळे ते दुष्काळी जनतेचे जलदुत ठरले आहेत. त्यांनी दुष्काळी भागात निर्माण केलेले बंधारे आता पावसाने भरून वाहू लागले आहेत त्यामुळे दुष्काळी भागासाठी ते खऱ्या अर्थाने जलदूत ठरले, येणाऱ्या कालावधीत संपूर्ण मतदारसंघ दुष्काळमुक्त करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

कोरोना संकटात आरोग्यदूत बनून जनतेला आधार
सलग दोन वर्ष कोरोना सारख्या गंभीर परस्थितीत या आमदारांनी तालुक्यातील खेडोपाड्यात तळ ठोकून घाबरलेल्या जनतेला मोठा आधार देत आरोग्यदुत बनले यासाठी स्व-खर्चातून त्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोना हॉस्पिटल उभारली, यामुळे कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये जनतेला धीर मिळाला व हजारो रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांना नवजीवन मिळाले. त्यामुळे आमदार महेशदादा शिंदे हे तालुक्यातील प्रत्येक माणसासाठी आरोग्यदूत आधाराचे नाव बनले.

आमदार महेशदादांची राजकीय पॉवर वाढली
विकासात्मक वाटचाल करताना कोरेगाव विधानसभा मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती,विकास सेवा सोसायट्या त्यांनी आपल्या गटाची सत्ता स्थापन केली कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव नगरपंचायत त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि कोरेगाव शहराचा सर्वागीण विकास साधला या पाठोपाठ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तर अशक्य असणारी निवडणूक जिंकून सुनील खत्री यांना या बँकेवर संधी दिली त्यामुळे आज आमदार महेश दादा शिंदे यांचा मोठा राजकीय दबदबा या मतदार संघावर आहे हे नाकारून चालणार नाही आणि भविष्यात कोरेगावच्या उज्वल वाटचालीसाठी आमदार महेशदादा यांच्या पाठीशी जनता खंबीर साथ देईल हा विश्वास आहे.

अशा या विकासाचे मोठे संकल्प घेऊन मतदारसंघाचा आधार बनलेल्या या मोठ्या मनाच्या लोकनेत्याला आमदार महेश दादा शिंदे MLA MAHESH SHINDE यांना आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने शतश: शुभेच्छा..!

शब्दांकन: श्री धनसिंग सदाशिवराव कदम (चेअरमन- देऊर विकास सेवा सोसायटी)

संकलन-श्री.प्रकाश राजे (संपादक- महाराष्ट्र वन)

या वेबसाईटवर बातमी, लेख, जाहिराती साठी संपर्क ९८२३४७७३३० करा.

https://maharashtraone.com/?p=315: MLA MAHESH SHINDE: सर्वसामान्यांचा आधार,आपला आमदार- महेशदादा शिंदे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *