Headlines

government jobs: सातारा जिल्हा परिषदेमध्ये ९७२ पदांची मेगा भरती

government jobs

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती

५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले. government jobs

सरकारी नोकरी फॉर्म: सातारा जिल्हा निवड समितीच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या भरती बाबत पात्र उमेदवारांकडून दिनांक ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर परीक्षेबाबत शैक्षणिक अहर्ता ,वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ,अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती याबाबत सविस्तर माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी (www.zpsatara .gov.in ) या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावेत. सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रस्तुत परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क तसेच माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ केले आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागांची भरती government jobs

आरोग्य पर्यवेक्षक- १ आरोग्य सेवक पुरुष ४०% ७६, आरोग्य सेवक पुरुष ५०% हंगामी फवारणी कर्मचारी १७०, आरोग्य सेवक महिला -३५३, औषध निर्माण अधिकारी-३५ कंत्राटी ग्रामसेवक १०१ स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता ३२,कनिष्ठ आरेखक -२, कनिष्ठ लेखा अधिकारी- ४ प्रशासन कनिष्ठ सहाय्यक -६९ ,लेखा कनिष्ठ सहाय्यक- ७, पर्यवेक्षक -३, पशुधन पर्यवेक्षक -४२ प्रयोगशाळा तंत्रज्ञ -४, प्रशासन वरिष्ठ सहाय्यक -२, लेखा वरिष्ठ सहाय्यक -१०, कृषी विस्तार अधिकारी- १ शिक्षण विस्तार अधिकारी -२ सांख्यिक विस्तार अधिकारी -५, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -५२ अशा एकूण ९७२ पदासाठी ही मेगा भरती होत आहे.

अर्ज कसे व कुठे कराल government jobs

दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू व अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२३ परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे . परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर असणार आहे. उमेदवारांना अर्ज भरताना काही समस्या उद्भवल्यास 1800 222 366 व 18001034566 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. सरळ सेवा भरती करता विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी बाबत 0 21 62 295 0 53 संपर्क साधावा असेही सांगण्यात आलेले आहे. तसेच या संकेत स्थळावर https//ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ संपर्क साधण्यात यावा असे यावेळी सांगण्यात आले.government jobs

government jobs, government jobs after 12th, government jobs 2023

https://maharashtraone.com/?p=358: government jobs: सातारा जिल्हा परिषदेमध्ये ९७२ पदांची मेगा भरती

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *