Varkari Gurukul: कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे गुरुकुलचे भूमिपूजन
कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावाला अध्यात्मिक विचारांचा वारसा लाभला असून यामुळे येथे ज्ञानोबाराय वारकरी गुरुकुल उभे राहत आहे हे सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शक पाऊल आहे. कोरेगाव तालुक्यातील हे पहिले वारकरी गुरुकुल Warkari Gurukul असून याच्या उभारणीमूळे तालुक्याच्या अध्यात्मिक वैभवात भर पडेल व यातून ज्ञानवंत विद्यार्थी घडतील जे समाजाला दिशा दाखवतील असे गौरवोद्गार जंगली अंबवडे महाराज आश्रमाचे मठाधिपती ब्रम्हानंद महाराज यांनी काढले.
सोळशी येथे गाथा फाउंडेशनच्या माध्यमातून श्री ज्ञानोबाराय अध्यात्मिक वारकरी गुरुकुलची उभारणी करण्यात येत आहे. या गुरुकुलच्या वास्तूचे भूमिपूजन ब्रम्हानंद महाराज व भागातील पहिले जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प आनंदराव महाराज लेंभे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, सुरेश साळुंखे, संभाजीराव धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य नाना भिलारे, अजय कदम, बाळासाहेब भोईटे, दत्ताभाऊ धुमाळ, जीवन सोळस्कर, सोळशीचे सरपंच आकाश सोळस्कर, संस्थापक ज्ञानेश्वर यशवंत यादव व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ म्हणाले, माणूस कितीही शिकला तरी त्याचा विकास होण्यासाठी अध्यात्मिक विचारांचे आचरण होणे गरजेचे आहे. या गुरुकुलच्या माध्यमातून अध्यात्मिक प्रगतीचा पाया रचला जात असून यातून समाजाचा विकास साधण्याचे मोलाचे कार्य होणार आहे. भावी पिढी सुसंस्कृत व प्रगल्भ घडण्यासाठी हे गुरुकुल Warkari Gurukul या भागाला गरजेचे होते त्यामुळे याच्या उभारणीसाठी येथील जनता काहीही कमी पडू देणार नाही व देखणी वास्तू उभी राहण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी गुरुकुलचे संस्थापक ह.भ.प. योगेश महाराज यादव सोळस्कर म्हणाले, वारकरी वडिलांचे स्वप्न आज पूर्ण होत असून सोळशी गावासोबत तालुक्यातील मुलांना वारकरी धडे मिळावेत यासाठी हे धाडस केले आहे. यातून वारकरी परंपरेला बळकटी येईल. यात माझे गुरु, कुटुंब, मित्र परिवार व ग्रामस्थ, वारकरी भाविक या सर्वांच्या पाठबळ मिळत असून हि वास्तू उभारणीसाठी लोकवर्गणीतून अनेक दाते पुढे येतील हा विश्वास आहे.
यावेळी कार्याध्यक्ष संदीप महाराज धुमाळ, उपाध्यक्ष ह.भ.प सचिन लोखंडे, ह.भ.पसंदीप धुमाळ, ह.भ.पकृष्ण महाराज वाघ, ह.भ.पदत्त महाराज कोलगुडे, ह.भ.प सूर्यकांत महाराजपवार, ह.भ.प केतन महाराज साळुंखे, ह.भ.प पृथ्वी महाराज भोसले, ह.भ.पअनुज चव्हाण, ह.भ.पनिरंजन वाघ, ह.भ.प शुभम पवार, ज्ञानेश्वर कदम, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र शिंदे, पत्रकार प्रकाश राजे, माधव भोईटे, व वारकरी भाविक व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. सोळशीचे सरपंच आकाश सोळस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.