Headlines

Adhik Mass: प्रति पंढरपूर असलेल्या देऊर येथून पंढरपूरला ‘अधिक मास दिंडी’चे प्रस्थान

Adhik Mass

महाराष्ट्राचे अलौकिक तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील देऊर गावातून अधिक मासानिमित्त पायी दिंडी निघते. विशेष म्हणजे देऊर या गावी तेराव्या शतकात उभारलेले पुरातन विठ्ठल मंदिर असून यामुळे या गावाला प्रति पंढरपूर अशी ओळख मिळाली आहे.  राज्यभरातून भाविक या vithal mandir मंदिराचे देखणी वास्तू रचना व शिल्पकला पाहण्यासाठी भेट देतात. त्यासाठी येथील विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.

कसा आहे Adhik Mass दिंडी सोहळा

क्षेत्र देऊर ते पंढरपूर या अधिक मासा निमित्त आयोजित पायी दिंडी सोहळ्याचे हरी नामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. २९ रोजी हा पायी वारी सोहळा पंढरपूरला पोहचणार आहे. देऊरहून आदर्की,फलटण, पिंराड, मोरोची, पुरंदावडे,वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असा मुक्काम करीत हा पायी सोहळा २९ रोजी पंढरपूरला पोहचणार आहे. दर चार वर्षांनी अधिक महिन्यात हा दिंडी सोहळा आयोजित केली जातो.

हरी नामाच्या गजरात Adhik Mass दिंडीचे प्रस्थान

देऊर (ता.कोरेगाव) येथून  अधिक मासानिमित पंढरपूरला पायी दिंडीची परंपरा पूर्वापार होती मध्यतरीच्या कालावधीत ती बंद झाली होती मात्र गेल्या अधिक मासापासून ग्रामस्थांनी हि परंपरा पुन्हा पूर्ववत केली आहे. यावेळी अधिक मास हा श्रावण महिन्यात आला असून या टाळ-मृदूंगाच्या तालावर व हरी नामाच्या जयघोषात उत्साहात प्रस्थान झाले. यावेळी गावातून सजवलेल्या रथातून माऊलींची दिंडी प्रदिक्षणा काढली. 
    देऊरचे सरपंच शामराव कदम, उपसरपंच श्रीधर कदम, सोसायटी चेअरमन धनसिंग कदम, उपाध्यक्ष धनाजी कदम, माजी उपसरपंच राजेंद्र कदम, हिंदुराव पाटील नेरकर,  रमेश कदम, मोहन कदम, वसंत कदम, बबन तावरे, किसन शिंदे, शरद कदम, तानाजी चव्हाण, सोपान कदम, माधव  भोईटे, विनोद  पोळ, श्रीकांत कदम, मनोज कदम, वाल्मिक देशमुख, महेश शिंदे, योगेश कदम, तुषार कदम, समीर मांढरे, उमेश देशमुख, निलेश देशमुख, चंद्रकांत देशमुख, संभाजीतात्या कदम, वामन कदम, मनोज देशमुख, जालंधर जाधव, दादा जाधव, संतोष कदम, गणेश कदम, राजेंद्र कदम, संजय कदम, विठ्ठल कदम, युवराज टंकसाळे,रवींद्र कदम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *