टेलिकॉम विभागाने केला चाचणी Emergency Alert
आज सकाळी नेहमी प्रमाणे सर्वांची कामे रुटीन नुसार सुरु असताना १० वाजून २० मिनिटांनी तुमच्या smartphone वर १० सेकंदाच्या vibration सह Emergency Alert Notification इमर्जन्सी अलर्टचा संदेश आला. यामुळे बरेच जण गोंधळून गेले, नक्की काय प्रकार आहे हे समजत नव्हते, प्रत्येक जण एकमेकांना याबाबत विचारपूस करीत होते, पण यात घाबरण्याचे काहीच कारण नाही , केंद्रीय दूरसंचार विभाग Telecom Department च्या कडून देशभरातील नागरिकांना आपात काळात, संकटाच्या वेळी सूचना देण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित केली गेली असून आजचा वायरलेस संदेश हा केवळ याच्या चाचणी परीक्षणासाठी हा संदेश व अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
Emergency Alert Notification: काय आहे ‘इमर्जन्सी अलर्ट’
केंद्र सरकारच्या Telecom Department दूरसंचार विभागाने देशातील संकटा आणिबाणीप्रसंगी तसेच चक्रीवादळ, भूकंप, सुनामी, अतिवर्षा अशा मोठ्या नैसर्गिक संकटकाळात एकाच वेळी सर्व नागरिकांना सूचना संदेश देण्यासाठी Emergency Alert Notification मधून ‘इमर्जन्सी अलर्ट’ पाठवण्यात येईल. यासाठी आज चाचणी घेण्यात आली त्यामुळे भविष्यात देशावरील संकटात हि ‘इमर्जन्सी अलर्ट’ यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. यामध्ये नागरिकांना स्मार्टफोनवर व्हायब्रेशन सह इंग्रजी व प्रादेशिक भाषेत संदेश व व्हायब्रेशन
Emergency Alert Service:संकटकाळात सूचना देणार ‘इमर्जन्सी अलर्ट’
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने देशातील संकटा आणिबाणीप्रसंगी तसेच चक्रीवादळ, भूकंप, सुनामी, अतिवर्षा अशा मोठ्या नैसर्गिक संकटकाळात एकाच वेळी सर्व नागरिकांना सूचना संदेश देण्यासाठी Emergency Alert Notification मधून phone वर तात्काळ ‘इमर्जन्सी अलर्ट’ पाठवण्यात येईल. यासाठी आज चाचणी घेण्यात आली त्यामुळे भविष्यात देशावरील संकटात हि ‘इमर्जन्सी अलर्ट’ यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. प्रणालीमध्ये SOS हे एक वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला अडचणीच्या वेळी आपत्कालीन कॉल करण्यात मदत करते आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्कालीन SOS संदेश जलद आणि अधिक सोयीस्करपणे पाठवते. यामध्ये नागरिकांना स्मार्टफोनवर व्हायब्रेशन सह इंग्रजी व प्रादेशिक भाषेत संदेश मिळणार आहे. विशेष म्हणजे हा संदेश फोनला नेटवर्क रेंज नसली तरीही देशातील कोणत्याही दुर्गम भागातील नागरिकाला मिळणार आहे.
२३ एप्रिलला इंग्लंडनेही दिला होता चाचणी साठी ‘इमर्जन्सी अलर्ट’
आज देशातील नागरिकांनी Emergency Alert Notification मधून ‘इमर्जन्सी अलर्ट चा अनुभव घेतला असेल हि केवळ चाचणी होती हे स्पष्ट झाले जगभरातील देश हे तंत्रज्ञान वापरात असून २३ एप्रिल २०२३ ला इंग्लंड नेही त्यांच्या नागरिकांना Emergency Alert Notification मधून ‘इमर्जन्सी अलर्ट देत चाचणी घेतली होती यावेळी ब्रिटिश नागरिकांच्या स्मार्टफोनवर keep calm and carry on असा संदेश झळकला होता.