Headlines

SATARA: कोरेगाव शहरासह लगतची गावे झाली पाणीदार

koregaon- satara

पहिल्याच पावसामध्ये सिमेंट कॉंक्रीट बंधारे भरले

शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण

satara जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह लगतच्या गावांमधील शेतकर्‍यांची शेती पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. जलसंधारण विभागाच्या औरंगाबाद महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी बंधार्‍यांना मंजुरी मिळवून दिली होती. उन्हाळ्यामध्ये बंधार्‍यांची कामे पूर्ण करुन घेतल्याने आता पहिल्या पावसातच हे बंधारे भरुन वाहू लागले आहेत. बंधारे भरल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार महेश शिंदे MLA MAHESH SHINDE यांनी कोरेगाव शहरात तीळगंगा नदी आणि खारट ओढ्यावर महादेवनगर, दत्तनगर खराटवाडा, श्री केदारेश्वर मंदिराच्या पिछाडीस ८ बंधार्‍यांसह कुमठे, तडवळे संमत कोरेगाव, बोबडेवाडी, जांब बुद्रुक, जळगाव येथे बंधारे बांधण्यास मंजुरी मिळवून दिली होती. त्यांनी एकाच दिवसात कोरेगावात बंधारे बांधण्याचा शुभारंभ केला होता. शेतकरी बंधार्‍यासाठी जी जागा सूचवतील, त्याच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले, त्यामुळे आता पहिल्या पावसातच हे बंधारे आता ओव्हर फ्लो झाले आहेत. या बंधार्‍यांमुळे शेती पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी संपुष्टात आल्याने शेतकर्‍यांनी धन्यवाद दिले आहेत.
जळगाव येथे स्मशानभूमीलगत वसना नदीवर असलेला सिमेंट कॉंक्रीट बंधारा भरुन वाहू लागला आहे. या बंधार्‍यातील पाणी पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.

पाऊस आला अन पाणीही साठले ..काळजी मिटली

आमदार महेश शिंदे यांनी अत्यंत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, त्या सोडविण्यासाठी विशेष पुढाकार देखील घेतला होता. जलसंधारण विभागाने सिमेंट काँक्रीट बांधरे बांधण्यास मान्यता दिल्यानंतर एकाच वेळी सर्व ठिकाणी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अत्यंत कमीत कमी कालावधीत दर्जेदार काम करून घेत बंधारे पावसाळ्यापूर्वी तयार झाले होते. पावसाळ्यातील पहिल्या पावसातच बंधारे ओव्हर फ्लो झाले असून नदी काठालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी पातळी देखील लक्षणीय वाढली आहे. नजीकच्या काळात पाणी पातळीचा स्तर कायम राहणार असून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची कोणती अडचण येणार नाही. एकूणच शेतकऱ्यांची यावर्षीची सणसुद गोड होणार असल्याने त्यांनी आमदार महेश शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.

Read more: SATARA: कोरेगाव शहरासह लगतची गावे झाली पाणीदार

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *