आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश MLA Mahesh Shinde
विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास निधी आणण्याची आमदार महेश शिंदे यांची परंपरा यावेळेस देखील कायम राहिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय ना. देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी विकास निधीला हिरवा झेंडा दाखविला आहे. एकूणच आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेला विकासकामांचा शब्द खरा करुन दाखविला आहे.
राज्यात मध्यंतरीच्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यातून अनेक नेतेमंडळींनी आपआपल्या परीने संदर्भ जोडले आणि टिकाटिप्पणी केली, मात्र आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीच सूचित केल्याप्रमाणे घडामोडी घडत गेल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव साठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी रुपये तर पुरवणी अर्थसंकल्पातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
अशी होणार कोरेगावातील विकासकामे
दोनच दिवसांपूर्वी कोरेगाव शहरात लक्ष्मीनगर येथे विकास कामांचा शुभारंभ करत असताना येत्या ८ महिन्यात कोरेगाव शहर पश्चिम महाराष्ट्रातील स्वच्छ व सुंदर आणि आदर्शवत शहर बनवणार असल्याचा शब्द दिला होता, तो आता खरा ठरत असून निधीची तरतूद केली जात आहे. शहराच्या सुंदरतेकडे विशेष लक्ष दिले जात असून सुशोभीकरणालाही प्राधान्य दिले जात आहे. शहराच्या मधोमध वाहणार्या तीळगंगा नदीचे बकाल स्वरूप बदलून तिचे मूळ अस्तित्व कायम ठेवत नदीपात्राचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
दत्तनगर आणि महादेवनगर हे नवीन डिझाईनमधील पुलाने जोडले जाणार असून, दोन्ही बाजूला आकर्षक बागबगीचा तयार केला जाणार आहे. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व क्रॉंक्रीटीकरणामुळे साखळी पुलानजिक असलेले श्री मारुती मंदीर हे आता आतील बाजूस नदीकाढी स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी महादेवनगर येथे नव्याने सभा मंडप बांधण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महादेवनगर दहावा कट्टा ते साखळी पूल या दरम्यान दोन्ही बाजूने तीळगंगा नदीचे सुशोभिकरण पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. दोन्ही बाजूला मॉर्निंग वॉकिंग ट्रॅक, सुंदर बाग बगीचे, साकव पूल आणि महादेव नगर ते केदारेश्वर मंदिर आणि दत्तनगर ते केदारेश्वर मंदिर असा भला मोठा दोन्ही बाजूने प्रशस्त रस्ता देखील केला जाणार आहे. यासाठी तब्बल पाच कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे आता तिळगंगा नदी परिसर मोकळा श्वास घेणार आहे. एकूण तीन टप्प्यात हे काम केले जाणार आहे.
कोरगावातील भाजी मंडईचे रुप पालटणार MLA Mahesh Shinde
आझाद चौक भाजी मंडई व व्यापारी संकुल दृष्टीक्षेपात असून, लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. शहराच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी सुपर मार्केट तयार केले जाणार आहे. या कामासाठी वाढीव निधी म्हणून ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता एकूण सर्व निधी उपलब्ध झाला असून, भाजी मंडई-व्यापारी संकुलामध्ये शहराच्या वैभवात भर पडणारच आहे, त्याचबरोबर नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होणार आहे. कोरेगाव -रहिमतपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबरोबरच पदपथासाठी ६ कोटी रुपये पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्याचा सर्वांगिण विकास केला जात असून, हा रस्ता अधिक प्रशस्त होणार आहे.
हे पण वाचा https://maharashtraone.com/?p=178: MLA Mahesh Shinde: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव शहरासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधीतिळगंगा नदीच्या सुशोभीकरणामुळे कोरेगावच्या सौन्दर्यात होणार वाढ
कोरेगाव शहरातून वाहणारी तीळगंगा नदी ही अक्षरश: गटारगंगा बनली होती. कोरेगाव शहरातील बहुतांश नागरिकांना दिवसभरात काहीना काही कारणाने सातत्याने ही नदी ओलांडावी लागते. त्यावेळी त्यांच्या मनात कायम या नदीबद्दल विचार येत होते, नेमकी हीच बाब हेरुन आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांनी तीळगंगा नदी स्वच्छता व सुशोभीकरणासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. एकूण तीन टप्प्यात हे काम पूर्ण होणार असून नदीबरोबरच शहराचा चेहरामोहरा देखील बदलणार आहे, तिळगंगा नदीच्या सुशोभीकरणामुळे कोरेगावच्या सौन्दर्यात होणार वाढ असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे-
राजभाऊ बर्गे (माजी नगराध्यक्ष)