Headlines

NDA VS INDIA: लोकसभेची मोर्चेबांधणी NDA विरुद्ध INDIA

NDA INDIA

NDA चे दिल्लीत शक्तिप्रदर्शन

INDIA नावाने बंगळुरूत विरोधकांचा एल्गार

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधकांनी सुरु केलेल्या मोर्चेबांधणीने वेग घेतला असून दोन्हीही गट आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून एकप्रकारे Mission Loksabha साठी या बैठकांतून शक्तिप्रदर्शन केले जात आहे त्यामुळे देशात लोकसभा निवडूणुकीत आता NDA विरुद्ध INDIA अशी लढाई पाहायला मिळणार आहे. राजकीय मैदान आरोप प्रत्यारोप यांनी गाजणार आहे.

दिल्लीत झालेल्या NDA च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDAच्या गेल्या २५ वर्षतील प्रवासाचा मागोवा घेत NDA युती हि काळाच्या कसोटीवर खरी ठरलेली युती असून देशाचा विकास हेच एकमेव ध्येय NDA मध्ये असल्याचे सांगितले तर दुसरीकडे बंगळुरू मध्ये पार पडलेल्या विरोधी पक्षाच्या आघाडीने UPA चे नामांतर करीत इंडिया INDIA (indian national democratic inclusive alliance- भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी) असे नवे नाव जाहीर करीत आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत असे सांगत INDIA च्या एकजुटीचा नारा दिला.

NDA चे दिल्लीत शक्तिप्रदर्शन, 38 मित्र पक्ष सहभागी

नवी दिल्लीतील हॉटेल अशोका येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA ची बैठक सुपर पडली या बैठकीला भारतीय जनता पक्षासह देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेले 38 मित्र पक्ष सहभागी झाले. महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) हे या बैठकीत सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले आमच्या विरोधात एकत्र येण्याचा विरोधकांचा प्रयत्न हा प्रत्यक्षात घराणेशाही वाचवण्यासाठी आणि स्वत: केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेला डावपेच आहे. देशातील जनता सुजाण असून विरोधकांच्या फसव्या जाळयात अडकणार नाही. देशाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता हि NDA मध्ये आहे. देशाला स्थिरता मिळवून देण्यासाठी NDA ची स्थापना झाली आहे. सर्व जनतेचा आपल्याच आघाडीवर विश्वास आहे असेही ते म्हणाले. या बैठकीला भाजपा अध्यक्ष जे.पी .नड्डा, गृहमंत्री अमित शहा , महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चिराग पासवान व ३८ पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. nda full form- National Democratic Alliance

UPA चे नामांतर INDIA नावाने 26 पक्ष एकवटले

बेंगळुरूमध्ये 26 पक्ष एकत्र येत सत्ताधारी NDA विरोधात एकजुटीची वज्रमूठ आवळली, या आघाडीचे UPA चे नामांतर INDIA अर्थात Indian national democratic inclusive alliance असे केले. काँगेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे नाव जाहीर केले. इंडिया च्या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे (महाराष्ट्र), लालू प्रसाद यादव, नितीश कुमार (बिहार), ममता बॅनर्जी( प.बंगाल) मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला (जम्मू आणि काश्मीर), आणि अखिलेश यादव (उत्तर प्रदेश).भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी. राजा आणि सीपीआय (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी, अरविंद केजरीवाल(दिल्ली) भगवंत मान(पंजाब) एम. के.स्टॅलिन हे विविध पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. इंडिया ची पुढील बैठक मुबई येथे होणार असून यामध्ये ११ जणाची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

यावेळी अध्यक्ष मलिकार्जून खर्गे म्हणाले आज आम्ही 11 राज्यांमध्ये सरकारमध्ये आहोत. भाजपला स्वतःहून 303 जागा मिळाल्या नाहीत. आपल्या मित्रपक्षांच्या मतांचा वापर करून ते सत्तेवर आले आणि नंतर त्यांना टाकून दिले. भाजप अध्यक्ष आणि त्यांचे नेते त्यांच्या जुन्या मित्रपक्षांशी जुळवून घेण्यासाठी राज्य-राज्यात धाव घेत आहेत. येथे जे ऐक्य दिसत आहे त्याचा परिणाम पुढील वर्षी पराभवात होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. प्रत्येक संस्था हे विरोधकांच्या विरोधात शस्त्र बनवले जात आहे. या बैठकीत आमचा हेतू स्वत:साठी सत्ता मिळवण्याचा नाही. ते लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करण्यासाठी आहे. भारताला पुन्हा प्रगतीच्या, कल्याणाच्या आणि खऱ्या लोकशाहीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया.

हे पण वाचा https://maharashtraone.com/?p=257: NDA VS INDIA: लोकसभेची मोर्चेबांधणी NDA विरुद्ध INDIA हे पण वाचा https://maharashtraone.com/?p=178&_thumbnail_id=180: NDA VS INDIA: लोकसभेची मोर्चेबांधणी NDA विरुद्ध INDIA

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *