राष्ट्रवादीला मिळाली ‘हेवी वेट’ खाती,
जाणून घ्या कोणाला मिळाली कोणती खाती
Maharashtra Cabinet: राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर १३ दिवसापासून लांबलेला खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला, उपमुख्यमंत्री अजितदादांना अर्थ व नियोजन खाते तर धनंजय मुंडे यांना कृषी खाते मिळाले आहे, दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार सोपवला गेला आहे. याखेरीज छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खाते अशी हेवी वेट खाती अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाला मिळाली आहेत. नव्या मंत्रिमडळात भाजपकडून सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीला देण्यात आली.
राज्यात गेल्या पंधरवड्यात मोठा राजकीय भूकंप झाला व शिंदे- फडणवीस सरकारशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले, त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप यांचा एकाच धुरळा उडाला यात शिंदे व राष्ट्र्वादीत खातेवाटपावरून ओढाताण सुरु होती त्यामुळे शपथविधी उलटून तेरा दिवस झाले तरी या मंत्रांना खाती मिळत मिळत नव्हती, त्यामुळे नाराजीच्या चर्चांना वेग आला होता.
दादांच्या ‘दिल्ली’ वारीला ‘अर्थ’ मिळाला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते हवे होते तर सोबत आलेल्या मंत्र्यांना हेवीवेट खाती मिळावी यासाठी राष्ट्रवादी मोर्चेबांधणी करीत होती, अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत दिल्लीला भेट देत, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यात खातेवाटपावर तोडगा निघाला व दिल्लीवारीला ‘अर्थ’ मिळाला, त्यानुसार आज नवे खाते वाटप जाहीर झाले यात अपेक्षे प्रमाणे अजितदादांनी अर्थ खात्यावर आपल्या नावाचा शिक्कमोर्तब केले. तर सहकारी मंत्र्यांची हेवीवेट खात्यावर वर्णी लावण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचेकडील कृषी खात्याचा भार काढून त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. बाकीच्या मंन्त्र्यानी आपआपली खाती कायम राखली आहेत
राष्ट्रवादीला मिळालेली हेवीवेट खाती
अजित पवार – अर्थ, नियोजन
छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
धर्मरावबाबा अत्राम- औषध व प्रशासन
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – कृषी
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
जाणून घ्या कोणाला मिळाली कोणती खाती
Maharashtra Cabinet: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील –सहकार.
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.
चंद्रकांतदादा बच्चू पाटील –उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.
विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास.
गिरीष दत्तात्रय महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता.
दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण.
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि.
सुरेशभाऊ दगडू खाडे – कामगार.
संदीपान आसाराम भुमरे– रोजगार हमी योजना व फलोत्पादन.
उदय रवींद्र सामंत –उद्योग.
प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.
दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा.
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.
शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क.
कु. अदिती सुनील तटकरे – महिला व बालविकास.
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.
मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता.
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.