Headlines

Scholership Exam: शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे- शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे

Scholership Exam:देऊरला शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव

देऊर: श्रीमुधाईदेवी विद्यामंदिरात कोरेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यात बोलताना शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, व्यासपीठावर विश्वस्त धनसिंग कदम, शाळाप्रमुख प्रदीप ढाणे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख.

कोरेगाव/ प्रतिनिधी : Scholership Exam:देऊर येथील श्रीमुधाईदेवी विद्यामंदिरात कोरेगाव तालुका शिष्यवृत्तीधारक गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यात कोरेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी मा. धनंजय चोपडे यांनी विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान चांगले संपादन करून पुढील जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे. स्पर्धा परीक्षेचा शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्त धनसिंग कदम होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुलांना लहान वयातच पाया मजबूत करून पुढील जीवनात यश मिळवावे असे प्रतिपादन केले.
यावेळी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गटात सोनके केंद्रातील जि. प.प्रा. शाळा नांदवळ मधील शौर्य प्रशांत निकम, प्रणव विनोद पवार स्वरा स्वप्नील बस्के, संचिता दीपक लाहिगुडे. जि.प. प्रा. शाळा नायगाव मधील श्लोक सागर निकम. जि प प्रा. शाळा सोनके मधील कृष्णा संतोष फडतरे,पिं पिंपोडे बुद्रुक केंद्रातील जि.प. प्रा. शाळा सर्कलवाडी मधील अर्णव संतोष यादव. कु .प्रार्थना नेताजी पाटील पिंपोडे खुर्द केंद्रातील जि.प.प्रा. शाळा रेवडी मधील ओम निवृत्ती सलगरे . पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बुद्रुक मधील कु.वैष्णवी शत्रुघ्न यादव, भारत विद्या मंदिर वाघोली मधील कु. प्रांजली प्रवीण कोरडे,चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय सातारारोड मधील कु.सेजल सचिन वाघ ,श्री वागदेव विद्यालय वाठार स्टेशन मधील आर्यन किरण भोईटे, श्री मुधाईदेवी विद्या मंदिर देऊर मधील विराज वीरसिंग शिंदे, कु. संचिता उमेश शिंदे, कु.मृणाल राहुल शिंदे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य प्रदीप ढाणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात चांगले यश संपादन करावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात श्री मुधाईदेवी विद्यामंदिराचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख, शिक्षक प्रतिनिधी मनेश धुमाळ उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सौ .वनिता मोरे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्रसाद गायकवाड यांनी केले. तर सौ शुभांगी शिंदे यांनीआभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.Scholership Exam:

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *