Headlines

ग्रामस्थांनी अवघ्या तीन तासात बांधला वनराई बंधारा

koregaon

कोरेगावातील सुभाषनगरच्या नागरिक व विद्यार्थ्यांचे श्रमदान

काेरेगांव । यावर्षी पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काेरेगांव शहरातील संभाजीनगर या उपनगरातील नागरिकांनी एकत्र येवून तालुका कृषि कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या तीन तासात वनराई बंधारा उभारला आहे.
तालुका कृषि विभाग, काेरेगांव औद्याेगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांनी मंगळवारी भल्या सकाळी एकत्र येवून शिंदे मळा ते फडके विहीर लगतच्या शिवारात असलेल्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. या कामात काेरेगांव आयटीआयच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांसह शिक्षक, छत्रपती संभाजीनगर मधील युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह कृषि विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. सलग तीन तास केलेल्या या श्रमदानानंतर वनराई बंधारा पूर्णत्वास आला. या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी तालुका कृषि विभागाचे मंडल कृषि अधिकारी संकेत धुमाळ व कृषि सहाय्यक हिमगाैरी डेरे-बर्गे यांनी मार्गदर्शन केले. आयटीआयचे विद्यार्थी व नागरिक यांच्या मानवी साखळीतून सुमारे चारशे पाेत्यांमध्ये वाळू मिश्रीत माती भरुन या वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी थेट संभाजीनगर मध्ये येवून या कामाचे विशेष काैतुक केले. त्यावेळी बाेलताना त्या म्हणाल्या, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरी भागात एवढी माेठी जागृतता आज काेरेगांवकरांनी दाखवून दिली आहे. कृषि विभागाच्या अवाहनाला प्रतिसाद देवून काेरेगांव शहरात लाेकसभागातून उभारलेला हा वनराई बंधारा निश्चितच जिल्ह्यातील सर्व गावांना प्रेरणादायी ठरणार आहे. ओढ्या-नाल्यांचे वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून आडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष माेहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी लाेकसहभाग गरजेचा असून प्रत्येक गावातील लाेकांनी एकत्र येवून अशा वनराई बंधाऱ्यांची उभारणी करावी व संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न करावा असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.
या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी काेरेगांव तालुक्याचे कृषि अधिकारी ज्ञानदेव जाधव, मंडल कृषि अधिकारी संकेत धुमाळ, काेरेगांव आयटीआयचे शिल्प निदेशक अनिल खताळ, उपशिक्षक विकास पवार, कृषि पर्यवेक्षक अर्जुन भाेसले, पर्यवेक्षक विजय वसव, कृषि सहाय्यक हिमगाैरी डेरे-बर्गे, कृषि सहाय्यक प्रियांका गायकवाड, कृषि सहाय्यक संदीप राजळे, कृषि सहाय्यक संताेष गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत बाजार समितीचे माजी उपसभापती उदयसिंह बर्गे, ज्येष्ठ नागरिक फत्तेसिंहबाबा बर्गे, छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अध्यक्ष प्रणव बर्गे, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष सुनिल भाेसले, रमेश पाटील, प्रतापसिंह बर्गे, विजयराव सपकाळ, प्रकाश मालुसरे, शशिकांत गायकवाड, संताेष नलावडे, विकास वेल्हाळ, अजित चव्हाण, अमर देशमुख, समिर मालुसरे, राेहित बुधावले, अभिषेक शेरे, राज भाेसले यांनी केले.

फोटाे ओळ : छत्रपती संभाजीनगर मधील वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना जिल्हा कृषि अधिक्षक जयश्री फरांदे साेबत ज्ञानदेव जाधव, संकेत धुमाळ, हिमगाैरी डेरे-बर्गे, उदयसिंह बर्गे, अनिल खताळ आदी.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *