Uttar Koregaon Marathi Patrakar Sangh Executive Committee 2026 उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल लेंभे; उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ

Uttar Koregaon Marathi Patrakar Sangh Executive Committee 2026 उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल लेंभे; उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ

कार्याध्यक्षपदी संजय कदम, सचिवपदी रणजीत लेंभे तर खजिनदारपदी जलाल पठाण यांची निवड;

वाठार स्टेशन | महाराष्ट्र वन वृत्तसंस्था

Uttar Koregaon Marathi Patrakar Sangh Executive Committee 2026 कोरेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवानी एकत्र येऊन सुरु केलेल्या उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघाच्या अध्यक्षपदी राहुल लेंभे यांची, तर उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी संजय कदम, सचिवपदी रणजीत लेंभे आणि खजिनदारपदी जलाल पठाण यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

उत्तर कोरेगाव परिसरातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासूनच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह सामाजिक बांधिलकी जपत संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा पत्रकार संघाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष प्रकाश कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत पत्रकार संघाच्या विविध उपक्रमाबाबत विविध विषयावर विचारमंथन झाले. यावेळी संघाचे सचिव रणजित लेंभे यांनी गतवर्षाचा आढावा मांडला व पुढील वर्षाच्या उपक्रमांना मान्यता घेतली. याचबरोबर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

आज झालेल्या निवड प्रक्रियेसाठी संघाचे २० सदस्य पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्षपदाची निवड मतदानाद्वारे करण्यात आली, तर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदांची निवड सर्वानुमते करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित पत्रकारांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न राहता पत्रकार बांधवानी सांघिक पणे एकत्र येत एक परिवार म्हणून एकजूट राहावे, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत पत्रकारांच्या कल्याणासाठी गेल्यावर्षी हा संघ हेल्या वर्षी सुरु केला. संघातील प्रत्येक पत्रकार सदस्याने याच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले यामुळे संघाच्या माध्यमातून सुरु झालेला प्रवास पुढे यशस्वी झाला. पत्रकार कल्याणच्या विविध योजना व सामाजिक उपक्रम राबवत उत्तर कोरेगाव पत्रकार संघाने वेगळपण सिद्ध केले यात सर्व सदस्यांचे यश आहे, नवीन कार्यकारिणी देखील संघाचा पुढील वाटचाल दमदार व यशस्वी करतील असा विश्वास मावळते अध्यक्ष प्रकाश राजे यांनी व्यक्त करीत नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा व सूत्रे दिली.

यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझी निवड करून आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करुन दाखवेन. उत्तर कोरेगाव पत्रकार संघाने जिल्ह्यात आपले वेगळे पण सिद्ध केले आहे व गौरवास पात्र ठरला आहे. या संघाची परंपरा कायम राखून दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत पत्रकारांच्या हक्कासाठी व कल्याणासाठी विविध उपक्रम आणि योजना राबवून हि परंपरा पुढे नेऊ. या माध्यमातून येणाऱ्या काळात पत्रकार संघाला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करु आणि उत्तर कोरेगावची ओळख राज्यभर पोचवू. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. अशा शब्दात संघाचे नूतन अध्यक्ष राहुल लेंभे यांनी मनोगत व्यक्त केले.

संघाचे सचिव रणजित लेंभे यांनी प्रास्ताविक करीत संघाची वाटचाल व भूमिका विषद केली. सर्वानी दिलेल्या पाठबळामुळे संघाने एक वर्षाची कारकीर्द यशस्वी केली हीच एकजूट पुढे कायम ठेवून अशीच दिशादर्शक वाटचाल करीत उत्तर कोरेगाव पत्रकार संघ हा कुटुंब म्हणून एकत्र राहुयात. पत्रकार म्हणून कार्य करीत असताना एकमेकांना आधार देत राहुयात आणि पुढे जाऊयात असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी उपाध्यक्ष शैलेश धुमाळ व कार्याध्यक्ष संजय कदम व खजिनदार जलालभाई पठाण यांनी भूमिका व्यक्त केली.

यावेळी वार्षिक सभेसाठी प्रकाश कुंभार, शैलेश धुमाळ, राहुल लेंभे, कमलाकर खराडे, संजय कदम, मुकुंदराज काकडे, जलाल पठाण, अरुण जायकर, संतोष पवार, संतोष धुमाळ, रणजीत लेंभे, रेवणसिद्ध महाजन, विजयकुमार दोरके, अतुल वाघ, आदिनाथ धुमाळ, तेजस लेंभे, संदीप पवार, शुभम गुरव, स्वप्निल शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू