उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर Patrakar Sanghtana

उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर Patrakar Sanghtana

Patrakar Sanghtana अध्यक्षपदी प्रकाश राजे, उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ यांची निवड

सचिवपदी रणजित लेंभे, खजिनदारपदी जलालभाई पठाण, कार्याध्यक्ष शुभम गुरव

वाठार स्टेशन ॥ (प्रतिनिधी)

Patrakar Sanghtana कोरेगाव तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या पत्रकारांच्या उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच एकमताने निवडून जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश राजे कुंभार देऊर यांची तसेच उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ सोनके यांची एकमताने निवड करण्यात आली तर सचिवपदी रणजित लेंभे पिंपोडे बु ॥, खजिनदारपदी जलाल खान पठाण वाठार स्टेशन तर कार्याध्यक्षपदी शुभम गुरव आसनगांव यांची निवड करण्यात आली.
वाठार स्टेशन (ता . कोरेगाव ) येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. यावेळी बैठकीत पत्रकार बांधवांशी संबंधित विविध अडचणी, त्यांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना तसेच संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा झाली.
पत्रकारांचे संघटित कार्य व विविध अडचणी,समस्यासह, विमा संरक्षण, शासकीय विविध योजना, आरोग्य व सामाजिक उपक्रम, शिबीर आयोजन, स्वनिधी संकलन विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.पदाधिकारी हे केवळ निमित्त आहेत हा क्षण दुर्मिळ न होता आपण सर्वजण सर्व पत्रकार एकत्रित व संघटित राहून चांगल्या प्रकारे कार्यरत राहु असे पत्रकार संघाचे सचिव रणजित लेंभें यांनी सांगितलेPatrakar Sanghtana .
यावेळी पत्रकार कमलाकर खराडे, राहुल लेंभे, संतोष पवार, रेवनसिद्ध महाजन, तेजस लेंभे, मुकुंद काकडे, संतोष धुमाळ, अतुल वाघ, संजय कदम, विजय दोरके, संदीप पवार, आप्पा जायकर, आदिनाथ धुमाळ यांच्यासह उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या हक्क, हक्कसंरक्षण आणि व्यावसायिक प्रश्न सोडवण्यासाठी संघ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. Patrakar Sanghtana

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू