Wathar Police Station News Koregaon: उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार !

Wathar Police Station News Koregaon: उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार !

वाठार स्टेशन | Maharashtra One News

Wathar Police Station News Koregaon उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा वाठार पोलीस स्टेशनच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. सुशीलकुमार भोसले यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस आणि पत्रकार यांच्यात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पत्रकारांची भूमिका महत्वाची असून विधायक कामासाठी प्रत्येक वेळी सहकार्याची भूमिका असते. सोशल पोलिसिंग करण्यासाठी पत्रकार व पोलीस यांच्यात विचारांचा संवाद झाला पाहिजे तर अपेक्षित परिणाम मिळतील असे मत सपोनि सुशील भोसले यांनी व्यक्त केले.

पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व सत्कार

या कार्यक्रमाला उत्तर कोरेगाव पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष राहुल लेंभे, उपाध्यक्ष शैलेश धुमाळ, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव रणजित लेंभे, खजिनदार जलालभाई पठाण, माजी अध्यक्ष प्रकाश राजे, तेजस लेंभे, अतुल वाघ, मुकुंदराज काकडे आणि संघाचे इतर सदस्य प्रमुख उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर माजी अध्यक्ष प्रकाश राजे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.

पोलीस-पत्रकार सुसंवाद बैठक व ‘गणराया अवॉर्ड’ समिती

या बैठकीत पोलीस आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गणेशोत्सवाच्या नियोजनांतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या ‘गणराया अवॉर्ड समिती’मध्ये पत्रकार संघाच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला.

बाजारपेठेत सीसीटीव्ही (CCTV) अन् रोडरोमिओंवर धडक कारवाई!

वाठार स्टेशन परिसर आणि आसपासच्या गावांमधील वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी मुख्य बाजारपेठ आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

तसेच वाठार, देऊर, वाघोली आणि पिंपोडे कॉलेज परिसरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या युवकांच्या टोळक्यांवर व रोडरोमिओंवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा सपोनि सुशील भोसलेपोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव यांनी दिला आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी अशा असामाजिक तत्वांवर कारवाई करताना ‘कोणाचीही हयगय केली जाणार नाही’, असे कडक शब्दांत पोलीस प्रशासनाने बजावले आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू