Bandhkam Kamgar Yojana 2026: बांधकाम कामगार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात; सचिन टिके पुन्हा अध्यक्षपदी तर बंडा लेंभे उपाध्यक्षपदी बिनविरोध!

वाठार स्टेशन | महाराष्ट्र वन न्यूज
Bandhkam Kamgar Yojana 2026 बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा आणि कामगारांच्या हक्कासाठी सतत कार्यरत असणाऱ्या बांधकाम कामगार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, पिंपोडे बुद्रुक यांचा पाचवा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार पडला. या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वार्षिक सर्वसाधारण सभा व नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया सोमवारी (दि. ३) वाठार स्टेशन येथील ‘राधे कृष्ण मंगल कार्यालयात’ पार पडली.
या सभेत संस्थेचे संस्थापक सचिन दत्तात्रय टिके यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, तर प्रवीण उर्फ बंडा प्रकाश लेंभे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
Bandhkam Kamgar Yojana अन् कल्याणकारी योजनांवर चर्चा
गेल्या पाच वर्षांपासून ही संस्था Bandhkam Kamgar Yojana च्या शासकीय सवलती, कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे. सभेदरम्यान संस्थेच्या पाच वर्षांतील ध्येय-धोरणांचा आढावा घेण्यात आला. बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या ‘बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, नवनवीन कामगार नोंदणी करणे आणि आगामी काळातील कामगार हिताच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली.
उपस्थित सर्व कामगार सभासदांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या ५ वर्षांतील उत्कृष्ट कार्यावर विश्वास दाखवत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड केली.
संस्थेची नवनिर्वाचित नवीन कार्यकारिणी
संस्थेच्या अध्यक्षपदी सचिन दत्तात्रय टिके यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण उर्फ बंडा प्रकाश लेंभे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्ष म्हणून सूर्यकांत रमेश पवार, सचिव म्हणून वैशाली रामचंद्र बनसोडे, सहसचिव म्हणून योगिता शिवाजी नलवडे, खजिनदार म्हणून विजय शिवाजी सावंत आणि सहखजिनदार म्हणून वैभव संजय साळुंखे यांची निवड झाली आहे. यासोबतच अनिता रोहिदास नलवडे व सुषमा शशिकांत कदम यांनी संचालिका म्हणून तर संजय बाळू पवार आणि हरिदास सदाशिव शेरे यांनी संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
सभेच्या शेवटी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सर्व बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि Bandhkam Kamgar Yojana चे लाभ तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास बांधकाम कामगार, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.











