Sugar Price Hike News 2026: ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कमी, महागाईने चहाचा घोट कडू; १५ दिवसांत भाव थेट ८० रुपये किलोवर!

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!
मुंबई | Maharashtra One News
Sugar Price Hike News 2026 गेल्या १५ दिवसांत देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात (Domestic Sugar Price) तब्बल ४० टक्क्यांची प्रचंड उसळी मारली असून, महिनाभरापूर्वी ४५ ते ५० रुपये प्रति किलो असणारी साखर सध्या थेट ७० ते ८० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. ऐन सण-उत्सवाच्या काळात साखरेचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या बजेटचा अंदाज कोलमडला असून चहाचा गोडवाच नाहीसा झाला आहे. वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयातीचा (Raw Sugar Import) निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता धुसर दिसून येत आहे.
Sugar Import Policy: आयात साखरेनेही महागाईला पूर्ण ब्रेक नाही
केंद्राने १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याची परवानगी दिली असली, तरी ती साखर प्रत्यक्ष भारतीय बाजारात येण्यासाठी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखर आयात करण्यासाठी अत्यंत मोजकेच पर्याय उपलब्ध आहेत. या आयातीनंतरही साखरेच्या दरामध्ये फार तर प्रति किलो ४ ते ५ रुपयांचीच घट होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या सुरू असणारा साखर हंगाम (Sugar Season) सुरू होण्यासाठी अजून किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने पुढील काही दिवस ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.
Government Stance: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची स्पष्टोक्ती
साखरेच्या या अचानक झालेल्या दरवाढीवर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Co-operative Minister Babasaheb Patil) यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन (Sugar Production) कमी झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असून, बाजाराचे गणित पुरवठ्यावर चालत असल्याने ही दरवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. एफआरपी (FRP – Fair and Remunerative Price) आणि इतर खर्च भागवण्यासाठी साखर कारखान्यांनी ८० ते ९० टक्के साखर आधीच विकून टाकली आहे. तरीही राज्य सरकार साठेबाजांवर कडक नियंत्रण ठेवेल आणि योग्य प्रमाणात व रास्त दरात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले.
Artificial Price Rise: राजू शेट्टी यांचा कृत्रिम दरवाढीचा गंभीर आरोप
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana Leader Raju Shetti) यांनी साखर दरवाढीवरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सध्याची ही दरवाढ नैसर्गिक नसून किमान २० ते २२ हजार कोटी रुपयांचा कृत्रिम सट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Former Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांच्या मते, गेल्या दोन वर्षांतील उसाचे घटते क्षेत्र आणि एथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) देण्यात आलेला भर यामुळे साखरेचे उत्पादन घटले आहे. मात्र, राजू शेट्टी यांच्या मते ही तेजी केवळ सट्टेबाजी आणि पैनिक बाइंगचा (Panic Buying) परिणाम आहे. असे म्हटले आहे.
Food Inflation: खाद्यान्न आणि पशु आहारातही मोठी वाढ
साखरेच्या या दरवाढीचा थेट परिणाम इतर खाद्यपदार्थांवरही झाला असून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडले आहे. गेल्या तीन महिन्यांत साखरेचे भाव ४८ रुपयांवरून थेट ७० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. साखरेसोबतच गूळ (Jaggery Rate) ५० रुपयांवरून ६५ रुपये प्रति किलो झाला आहे. तांदूळ कणीक २५ वरून २९ रुपये, मक्याचे पीठ ३६ वरून ४० रुपये आणि इडली रवा ३८ वरून ४२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. याशिवाय खराब धान्याचा साठा कमी झाल्यामुळे पशु आहार (Cattle Feed Rate) २९ वरून ३२ रुपये आणि कोंबडी खाद्य (Poultry Feed Rate) २३ वरून २५ रुपये प्रति किलो झाले असून त्यात ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
साखरेचे भाव ८० रुपये पार; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!
एथेनॉल निर्मिती अन् घटत्या साठ्यामुळे साखरेचे भाव गगनाला!
ही महत्त्वाची बातमी तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा!












