Ashadhi Ekadashi 2026: UK घुमला आषाढी एकादशीला हरिनामाचा गजर, ऐतिहासिक London to Pandharpur-‘Global Wari’चे UK मध्ये भक्तिमय स्वागत..!

11 देशांचा प्रवास करत वारकरी परंपरा पोहचली सातासमुद्रापार!
Slough (UK) / महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Ashadhi Ekadashi 2026 चे औचित्य साधून Shree Vitthal-Rukmini Temple, UK (SVRTUK) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “Global Wari – London to Pandharpur” या अभूतपूर्व आध्यात्मिक उपक्रमाचा मुख्य सोहळा Langley College Hall, Slough (UK) येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्ताने आषाढी एकादशीला विठूरायाच्या नामाचा गजर सातासमुद्रापार घुमला व ग्लोबल वारीच्या निमित्ताने तेथे पंढरीच अवतरली.
यंदा Global Wari – London to Pandharpur ११ देशांचा प्रवास करीत इंग्लंडहून भारतात आलेल्या श्री विठ्ठल पादुकांसमवेत देहू-आळंदी करीत हि वारी पायी पंढरपूरला पोहचली याठिकाणी विठुरायाच्या चरणी लिन होत पादुका भेट झाली यानंतर या पादुका पुन्हा UK ला नेण्यात आल्या तिथे या ग्लोबल वारीचे भक्तिभावात स्वागत झाले आणि आषाढी एकादशीचा हरिनामाचा गजर घुमला.
यंदाच्या या अनोख्या वारीत श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या पवित्र पादुकांनी London पासून तब्बल ११ देशांचा जागतिक प्रवास पूर्ण केला. Ashadhi Ekadashi 2026 निमित्त आयोजित या ऐतिहासिक उपक्रमामुळे जगभरातील विठ्ठल भक्तांना एका धाग्यात बांधत “वसुधैव कुटुंबकम ” आणि वारकरी संप्रदायाचा संदेश Global Level वर पोहोचवण्याचे मोलाचे कार्य झाले आहे.
महाआरती , पादुका दर्शन आणि दिंडी UK मध्ये आषाढी एकादशी
सोहळ्याच्या दिवशी सकाळी सांगता सोहळा, Maha Aarti आणि Paduka Darshan ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी SVRTUK and Global Wari Updates उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रम . पंढरपूर येथून नेलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पादुकांचा अभिषेक, दर्शन तसेच काला कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. यावेळी UK मधील भाविकांनी उपस्थिती लावली यामुळे पंढरीच अवतरली गेली.
Minister Dhananjay Munde यांच्याकडून कौतुक
या जागतिक उपक्रमात महाराष्ट्राचे Minister Dhananjay Munde यांनीही उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले. Ashadhi Ekadashi 2026 च्या निमित्ताने जगभरात वारकरी परंपरेचा आणि मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या Shree Vitthal Rukmini Temple UK (SVRTUK) या संस्थेच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या ऐतिहासिक Global Event ला देश-विदेशातील वारकरी, विविध Social Organizations, Volunteers आणि Media Representatives यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. यासर्वांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, यूके (Shree Vitthal Rukmini Temple UK) विश्वस्त अनिल खेडकर व त्यांच्या सहकार्यांनी आभार मांडले व विठुरायाची सेवा व विचार अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला.












