Ghigewadi Vriksha Dindi 2026: घिगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन् अंगणवाडीतर्फे ‘वृक्ष-दिंडी’ व ग्रामप्रदक्षिणा उत्साहात!

Ghigewadi Vriksha Dindi 2026: घिगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन् अंगणवाडीतर्फे ‘वृक्ष-दिंडी’ व ग्रामप्रदक्षिणा उत्साहात!

रणजित लेंभे, कोरेगाव | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था

Ghigewadi Vriksha Dindi 2026 आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्ती आणि पर्यावरणाचा सुंदर संदेश देत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी घिगेवाडी (ता. कोरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वृक्ष-दिंडी’ आणि भव्य ‘ग्रामप्रदक्षिणा’ सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” आणि “जय जय राम कृष्ण हरी” च्या गजराने संपूर्ण घिगेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वारकरी पोशाखात सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात विविध रोपे आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश देणारे फलक घेऊन गावातून दिंडी काढली.

पर्यावरण संवर्धन अन् भक्तीचा अनोखा संगम

या वृक्ष-दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून देण्यासोबतच गावात वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला. दिंडी दरम्यान ग्रामस्थांनी ठीकठिकाणी रोपांचे पूजन करून विद्यार्थ्यांचे आणि उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या पावसाळ्यात गावच्या हिरवाईत वाढ करण्यासाठी घरटी वृक्षरोपण करण्याच्या संकल्प केला गेला.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याला लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत, मुख्याध्यापक नाथाजी रूपनवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहित सावंत यांच्यासह आदिनाथ सावंत, रघुनाथ सावंत, निलेश सावंत, रविंद्र सावंत, पांडुरंग सावंत, अमृत सावंत, सदाशिव साळुंखे, मारूती सावंत, लखन, सुनिता घिगे, छाया घिगे, मनिषा धुमाळ आणि कल्पना सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच, गावातील जेष्ठ मार्गदर्शक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक, आजी-माजी सैनिक संघटना, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याशिवाय राजमाता जिजाऊ महिला ग्राम बचत गट, कर्मवीर ग्रुप, अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, जाणता राजा गणेशोत्सव मंडळ, दुर्गा माता तरुण मंडळ, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका आणि घिगेवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व उपक्रमाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू