Aaji Maji Sainik देशसेवेनंतर आता गावची सेवा! चंचळीत माजी सैनिकांच्या वतीने महाआरोग्य शिबीर व भव्य रक्तदान उपक्रम यशस्वी

चंचळीतील सैनिक संघटनेने महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या मंत्राला सार्थ ठरवला – पत्रकार प्रकाश राजे
कोरेगाव/प्रतिनिधी
Aaji Maji Sainik sanghatana महात्मा गांधी यांचा ‘खेड्याकडे चला’ व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ‘जय जवान, जय किसान’ हा मंत्र चंचळी गावातील आजी-माजी सैनिकांनी प्राणपणाने जपला आहे. देशाची सेवा केल्यानंतर गावाची सेवा करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेला महाआरोग्य शिबिराचा उपक्रम अतिशय दिशादर्शक असून चंचळी गावच्या सैनिकी परंपरेला सार्थ ठरवणारा आहे. असे प्रतिपादन उत्तर कोरेगाव पत्रकार संघाचे पूर्व अध्यक्ष प्रकाश राजे यांनी व्यक्त केले.
चंचळी (ता. कोरेगाव) आजी-माजी सैनिक संघटना यांच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत रोजी मौजे चंचळी येथे भव्य ‘महाआरोग्य शिबीर’ व ‘रक्तदान शिबीर’ अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
या महाआरोग्य शिबीर’ व ‘रक्तदान शिबीराचे शिबिराचे उदघाटन बारामती आजी-माजी सैनिक संघटनेचे गणपत फडतरे व उत्तर कोरेगाव पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र वन न्यूजचे संपादक प्रकाश राजे कुंभार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मानव विकास संस्थेचे अध्यक्ष सागर लेंभे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरवे, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष सावंत,आजी-माजी सैनिक संघटना चंचळीचे संस्थापक व अध्यक्ष श्री. नामदेव जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र किन्हईच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. गायत्री इंगवले मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी पुढे बोलताना प्रकाश राजे कुंभार म्हणाले की, सातारा जिल्ह्याला मोठी सैनिकी परंपरा आहे अशावेळी चंचळी सारख्या गावातून ९ ० हुन अधिक सैनिकांनी देशसेवेचे कार्य करीत गावाचे नाव उंचावले आहे. सैनिक कधी देशसेवेतून निवृत्त होत नसतो हे या आजच्या गावात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरातून पुन्हा अधोरेखित झाले. आजी माजी सैनिक संघटनेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी राहील.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष सावंत म्हणाले, सैनिकांनी सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाला आमची सदैव साथ राहील, सैनिकांच्या कल्याणाच्या कार्यात जे जे मदत लागेल ती देण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन देण्यासाठी पुढाकार घेईल या माध्यमांतून त्यांच्या देशसेवेच्या कार्याला सलाम ठरेल.


या महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण ४४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर २४८ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तसेच ४७ रुग्णांची ईसीजी तपासणी आणि २५८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बुद्राणी हॉस्पिटल पुणे येथे रेफर करण्यात आले आहे. या शिबिरास थमिक आरोग्य केंद्र किन्हईच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. गायत्री इंगवले मॅडम व त्यांचा सर्व वैद्यकीय स्टाफ, बालाजी ब्लड बँक सातारा आणि चंचळी गावातील आशा सेविकांचे विशेष सहकार्य लाभले.
या सर्व उपक्रमाचे यशस्वी आयोजन आजी-माजी सैनिक संघटना चंचळीचे संस्थापक व अध्यक्ष श्री. नामदेव जाधव, उपाध्यक्ष सुभेदार उत्तम गायकवाड, सचिव श्री. अशोक कदम, खजिनदार श्री. पृथ्वीराज कदम, श्री. जनार्दन कुंभार आणि सर्व आजी माजी सैनिक सभासदांनी अत्यंत चोखपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी संघटना अध्यक्ष श्री. नामदेव जाधव यांनी सर्व ग्रामस्थ, वैद्यकीय टीम व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली









