PDCC Bank Bharti 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८९ जागांसाठी भरती सुरु! ‘शिपाई’ पदासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

PDCC Bank Bharti 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८९ जागांसाठी भरती सुरु! ‘शिपाई’ पदासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

पुणे | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था

PDCC Bank Bharti 2026 पुणे जिल्ह्यातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, पुणे (PDCC Bank) यांच्या आस्थापनेवरील ‘शिपाई’ हुद्याच्या एकूण २८९ रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी केवळ पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा

या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सुरू झाली असून, उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ऑफलाईन लेेखी परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाउनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल. तसेच, लेखी परीक्षेच्या निकालानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

उमेदवारांसाठी आवश्यक अटी आणि सूचना

ही भरती प्रक्रिया १००% केवळ पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठीच राखीव आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) आणि आधार कार्ड अपलोड करणे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक अत्यंत अचूक भरावा, अन्यथा अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी बँकेच्या pdcc.bank.in/careers किंवा punedccbank.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू