Satara Police Raid वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई! गांजा विकताना महिला जेरबंद; २३ हजारांचा गांजा जप्त

Satara Police Raid : दोन दिवसांची पोलीस कोठडी
वाठार स्टेशन: Satara Police Raid सातारा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली असून, वाठार पोलिसांनी एका महिला गांजा विक्रेतीवर थेट छापा टाकून तिला बेड्या ठोकल्या आहेत. वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत लोणंद जाणाऱ्या रस्त्यालगतच्या वस्तीत ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी २३,२७५ रुपये किमतीचा ९३१ ग्रॅम वजनाचा ओलसर व वाळलेला गांजा जप्त केला असून, रूपाली लक्ष्मण बुधावले (वय ३२, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांनी वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सुशील भोसले यांना आपल्या हद्दीतील बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सपोनि भोसले यांनी गुन्हे शोध पथकाला (DB Team) गोपनीय माहिती काढण्याचे आदेश दिले होते.
दिनांक ३ जून २०२६ रोजी सपोनि सुशील भोसले यांना खात्रीशीर बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाठार ते लोणंद रोडवरील एका वस्तीत एक महिला बेकायदेशीरपणे गांजा विक्री करत आहे. माहिती मिळताच सपोनि भोसले यांनी तत्काळ कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना कल्पना देऊन त्यांची लेखी परवानगी घेतली. त्यानंतर पोलीस स्टाफ, महिला पोलीस आणि कोरेगावच्या नायब तहसीलदार सुनीता दिमते (कार्यकारी दंडाधिकारी) यांना सोबत घेऊन बातमीच्या ठिकाणी अचानक Satara Police Raid छापा टाकला.
त्या ठिकाणी एक महिला पांढऱ्या रंगाची बारदान्याची पिशवी घेऊन बसलेली आढळली. महिला पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने आपले नाव रूपाली बुधावले असे सांगितले. तिच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात हिरवट रंगाची पाने, फळे आणि बिया असलेला, उग्र वास येणारा २३,२७५ रुपये किमतीचा ९३१ ग्रॅम ओलसर व वाळलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासासाठी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेला कोरेगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने तिला २ दिवसांची पोलीस कस्टडी (कोठडी) मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव करत आहेत. Satara Police Raid
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सपोनि सुशील भोसले, नायब तहसीलदार सुनीता दिमते, पोउनि गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, सहाय्यक फौजदार बुवासो वाघमारे, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, दीपक साबळे, किरण जाधव, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, एकनाथ सरगर, अधिक शेलार, चालक संदीप गोरे, विजय ढाणे, महिला पोलीस हवालदार दिपाली गुरव, माधुरी दीक्षित आणि पूजा जगताप यांनी केली आहे. या यशस्वी आणि धडक कारवाईबद्दल सातारा पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले आहे.Satara Police Raid.
हे पण वाचा CRIME NEWS डीपी चोरीत पकडला आणि घरफोडीचा सूत्रधार निघाला, वाठार पोलिसांकडून घरफोडी उघडकीस











