Cockroach Janta Party Protest : दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे जंतर-मंतरवर भव्य आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी!

Cockroach Janta Party Protest : दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे जंतर-मंतरवर भव्य आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी!

Cockroach Janta Party Protest च्या आंदोलनाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली: देशातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून आज देशराजधानी दिल्लीत राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ Cockroach Janta Party (CJP) या आक्रमक राजकीय आणि सामाजिक चळवळीच्या वतीने आज दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर एक भव्य आणि विराट आंदोलन छेडण्यात आले आहे. “आवाज दो, हम एक है” आणि “जय भीम” च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण जंतर-मंतर परिसर दणाणून सोडला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान Dharmendra Pradhan यांनी आपल्या पदभार पाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.

अभिजीत दीपके थेट अमेरिकेतून दिल्लीत दाखल; पोलिसांनी दिली परवानगी

‘कॉकरोच जनता पार्टी’चे Cockroach Janta Party (CJP) संस्थापक अभिजीत दीपके हे थेट अमेरिकेतून भारतात परतले आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाच्या टर्मिनल ३ वर त्यांचे इमिग्रेशन पूर्ण होताच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. सुरुवातीला हे आंदोलन पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन येथे होणार होते; मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला थेट जंतर-मंतर येथे करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. दीपके यांनी सर्व कार्यकर्त्यांना थेट जंतर-मंतरवरच एकत्र येण्याचे आवाहन केले असून, आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

हातात पुस्तक आणि तिरंगा घेऊन आंदोलक रस्त्यावर!

शनिवारी सकाळी आंदोलनाबाबत सोशल मीडियावरून संवाद साधताना Cockroach Janta Party- Abhijit dipke अभिजीत दीपके यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना आपल्यासोबत एक पुस्तक आणि भारताचा तिरंगा घेऊन येण्याचे आवाहन केले होते. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली जिल्ह्यात तब्बल २ हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि प्रामुख्याने आंदोलकांच्या निशाण्यावर असलेले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शासकीय निवासाबाहेर सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे.

काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’ Cockroach Janta Party Protest (CJP)?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पणीतून या अनोख्या चळवळीचा जन्म झाला आहे. न्यायमूर्तींनी बनावट कायदेविषयक पदवी घेतलेल्या तरुण बेरोजगारांची तुलना ‘झुरळांशी’ (Cockroaches) केली होती. या विधानाचा निषेध म्हणून तरुणांनी एक व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली, जिचे रूपांतर आता एका मोठ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन समुदायात झाले आहे.

केवळ इंस्टाग्रामवरच या पक्षाचे ८० लाखांहून अधिक (8 Million+) फॉलोअर्स आहेत. या चळवळीला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासह देशातील अनेक मोठ्या व्यक्तींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कालच दिल्ली उच्च न्यायालयाने या आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) फेटाळून लावत आंदोलनाचा मार्ग मोकळा केला होता.

हे पण वाचा Cockroach Janta Party :मेम ते महाआंदोलन! कोण आहेत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक Abhijeet Dipke CJP? वाचा सविस्तर

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू