Post Office Recruitment 2026 खुषखबर; टपाल विभागात तब्बल २३,५५७ पदांची ‘मेगाभरती’

जाणून घ्या पात्रता, पगार आणि ऑनलाईन अर्जाची सोपी पद्धत
महाराष्ट्र वन न्यूज | नोकरी अपडेट
Post Office Recruitment 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय टपाल विभागाने (Post Office) देशभरात तब्बल २३ हजार ५५७ पदांची महाभरती जाहीर केली आहे. यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या तीन प्रमुख विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही मेगाभरती निघाल्याने बेरोजगार तरुणांसाठी ‘बाप्पा पावला’ अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रासाठी २,४३१ जागा आणि राज्यनिहाय आढावा
या मेगाभरतीमध्ये महाराष्ट्रातील तरुणांसाठी तब्बल २,४३१ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये सामान्य वर्गासाठी १०१६, ओबीसी ६००, एससी २४१, एसटी १९४, ईडब्ल्यूएस २४८ आणि इतर जागांचा समावेश आहे. इतर राज्यांमध्ये पश्चिम बंगाल १३६२, उत्तर प्रदेश १६९१, आंध्र प्रदेश ९१७, बिहार १०९८ आणि राजस्थान १००९ अशा विविध राज्यांमध्ये ही Post Office Recruitment 2026 भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार १० वी परीक्षा (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवता येणे ही अट ठेवण्यात आली आहे. २१ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क असून एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी हा अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे.
मिळणारा आकर्षक पगार
Post Office Recruitment 2026 मेगाभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तीन वेगवेगळ्या पदांनुसार वेतन श्रेणी दिली जाणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) या पदासाठी १२,००० रुपये ते २९,३८० रुपये पगार असेल, तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या दोन्ही पदांसाठी १०,००० रुपये ते २४,४७० रुपये या श्रेणीत वेतन दिले जाईल.
ऑनलाईन अर्जाची पद्धत आणि महत्त्वाची तारीख
Post Office Recruitment 2026 भरती संबंधीची सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, २१ सप्टेंबर २०२६ ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












